अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवावीत. कोणतीही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, संशोधक व मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ या काळात शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र गरज असेल तरच प्रवास करावा. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ संमिश्र आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. व्यवसायात काही चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र तब्येतीची काळजी घेणे या काळात आवश्यक आहे. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. संशोधक, ज्योतिषी, रत्ने किंवा खाणकामाशी संबंधीत काम करणारे लोक यांना उत्तम काळ आहे. काहींना या दरम्यान अचानक धनलाभ होऊ शकेल. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस अॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. कर्ज प्रकरणे लांबू शकतील. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी चालून येईल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ध्यानधारणेसाठी हा कालावधी चांगला आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील साधकांना काही चांगले अनुभव या काळात शक्य.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जोखीम असलेली कामे टाळा. या काळात कोणाला जामीन रहाणे तसेच कोणाच्या भांडणात मध्यस्थी करणे महागात पडू शकेल. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. न्यायाधीश, अध्यापक तसेच वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावे.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला चांगले ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कला/कौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. नित्योपासनेत लक्ष लागणे कठीण आहे. संततीशी वाद टाळावेत. मात्र हा कालावधी ज्योतिषशास्त्र, रेकी, सुजोक अशा गोष्टींच्या अभ्यासासाठी चांगला आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम बेभरवशाच्या गुंतवणूकीत सध्या पैसे नव्याने गुंतवू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. मात्र आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. तब्येतीचीसुध्दा या काळात काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक, खेळाडू यांच्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. सप्ताह अखेर संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आत्मविश्वास वाढीला लावणारे ग्रहमान आहे. लाभ होतील. संततीसौख्य चांगले लाभेल. प्रेमिकांना काही सुखद अनुभव या काळात येतील. विद्यार्थ्यांनी मात्र अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र अशा शास्त्रांकडे मन आकर्षित होऊ शकेल. सप्ताह मध्यात प्रतिकूल ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. बोलण्यावर संयम ठेवा. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत. घराच्या सुशोभीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी एखादा खर्च करावा लागू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी चांगलं ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नृत्यकलेशी संबंधीत असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. लेखक, प्रकाशक, संगीतकार, वादक व खेळाडू यांना चांगले यश मिळेल. सप्ताह मध्यात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. तब्येतीची काळजी घ्या. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास असंतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. भवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. प्रॉपर्टीची कामे करण्यास अनुकूलता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, धनस्थानात शुक्र, शनि, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल किंवा एखादा छंद जोपासायचा असेल तर त्यासाठी आत्ताची वेळ योग्य आहे. सप्ताह मध्यानंतर उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटीसुध्दा धनलाभाचे योग आहेत. मन आनंदी राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला आहे त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. व्यावसयिकांनाही लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी संपर्क साधाल. मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अती दगदग टाळा.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य कुंभेत प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग, मंगळाशी प्रतियोग व शुक्राशी केंद्रयोग होईल आणि शुक्र मीनेत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य व शनि यांची युती तर चंद्र व गुरु यांचा केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ गुरुचा चंद्र व बुधाशी लाभयोग आणि बुधाची चंद्राशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. खर्च वाढतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीची मदत किंवा मार्गदर्शन या काळात मिळू शकेल. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी थोडे अधिक परीश्रम करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. लाभदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस खर्च वाढतील. पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)