अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमच्यातील कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थी व खेळाडूंनाही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरदार लोकांना सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीबदलासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक, कवी, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती किंवा कुटुंबीयांबाबत काही कामे प्रलंबित राहिलेली असल्यास त्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. मात्र मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रेकी किंवा इतर गूढ शात्रे शिकायची असतील तर त्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. सप्ताहाच्या शेवटी वकील, आहारतज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. संशोधन कार्याशी ज्यांचा संबंध आहे त्यांच्यासाठी मात्र हाच काळ काहीतरी चांगले घेऊन येईल. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टी खरेदी/विक्रीची कामे करणार्या व्यावसायिकांना फायदेशीर सौदे चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या अखेरीस वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काही भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. सप्ताह अखेरीस भावंडांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक काही खर्च सामोरे येतील. मनाला एखाद्या गोष्टीची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. तुमच्या चीजवस्तू जपा. सप्ताह मध्यात तुमच्या एखाद्या कृतीने किंवा बोलण्याने लोकांशी वाद होण्याची शक्यता आ्हे काळजी घ्यावी. तब्येतीसंबंधी काही कुरबुरीही यादरम्यान जाणवतील. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ होऊ शकतील. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात काही बाबतीत लाभदायक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस काही महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात नोकरी/ व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक सुयश लाभेल. भावंडांशी संवाद साधाल. कार्यक्षेत्रात निपुणता यावी यासाठी शिक्षण किंवा एखादा कोर्स करण्याचे मनात असेल तर आता त्यासाठी जरुर विचार करावा. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी काही चिंता मनाला जाणवत रहातील. काहींना गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक गोष्टींसाठी व प्रवासासाठी अनुकूल आहेत. भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
घ्ज्क—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, प्लूटो, धनस्थानात शुक्र, शनि, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. वरीष्ठांकडून कौतूक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कोणत्याही वादात पडू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. धनलाभाचेही योग शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वादविवाद टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सोमवार दुपारपासून बुधवार संध्याकाळ पर्यंतचा काळ संमिश्र असेल. संमिश्र व्यापार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाराबरोबर मात्र वाद टाळावेत. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना अचानक धनलाभाचे योग किंवा अनपेक्षितपणे एखादी फायदेशीर घटना शक्य. मात्र पैशांची जोखीम ज्यात असेल असे व्यवहार या काळात टाळावेत तसेच या कालावधीत वाहन सावकाश चालवावे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)