अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभ होण्याची शक्यता आहे. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात चांगले यश मिळेल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. राजकारणी व्यक्तींना विशेष प्रगतीदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या अखेरीस मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. नंतरचे दोन दिवस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. खर्चही वाढणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. प्रवासयोगही या काळात शक्य. मात्र प्रवासात आपल्या चीजवस्तु सांभाळण्याची गरज आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताहाच्या अखेरीस अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात व सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होण्याचे योग आहेत मात्र काही अडचणीही या काळात त्रासदायक ठरु शकतील. एखाद्या मित्राचा किंवा परीचित व्यक्तीचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी परत ग्रहमान अनुकूल होत आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. बिल्डर/ रियल इस्टेटसंबंधी काम करणार्‍यांना फायदेशीर कालावधी आहे.सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाणार आहे. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी वाहने जपुन चालवावीत. भावंडांशी वाद होऊ देऊ नका. नंतर मात्र पुर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठी कालावधी चागला आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. घरात छान वातावरण असेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटीगाठी शक्य. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. रविवारी व्यापार्‍यांना अनुकूल दिवस आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. त्यानंतरच्या दोन दिवसात अनपेक्षितपणे एखादी फायदेशीर घटना शक्य. मात्र पैशांची जोखीम ज्यात असेल असे व्यवहार टाळावेत आणि वाहन सावकाश चालवावे. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक गुरु केला आहे त्यांना आज गुरुकृपेचे योग आहेत. काहींना प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल काळ आहे. लोकांचे सहकार्य मिळेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नये. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला आहे. प्रवासयोग येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, प्लूटो, धनस्थानात शुक्र, शनि, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्बेतीचीही काळजी घ्यावी. कर्जप्रकरणे यादरम्यान लांबू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल ग्रहमान आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होऊ शकेल. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस उत्तम आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. प्रवासयोग येतील मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. भावंडांशी वाद होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा शेवट विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रातून थोडाफार फायदा यादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)