अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र यादरम्यान वाहने जपून चालविणे आवश्यक आहे. ज्यांच्या पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना यादरम्यान पैसा/ जमीन किंवा इतर मार्गांनी अचानकपणे काही लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. आर्थिक लाभसुध्दा शक्य आहेत. एखाद्या स्त्रीमुळे कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग संभवतात. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उपासनेत मन रमेल. आज केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. खरेदीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून या काळात फायदा शक्य. मात्र जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मन प्रसन्न असेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासयोगही या काळात शक्य. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सायनस/ सर्दीचा त्रास या काळात जाणवू शकेल. सप्ताहाच्या शेवटी ज्यांना परदेशगमन करायचं आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. केलेल्या कामाचे चीज होइल. एखादा धनलाभ होता होता राहू शकेल. आरोग्याच्या समस्या या दरम्यान काहींना जाणवतील. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. नृत्यकलेशी संबंध असणार्या लोकांना चांगला काळ आहे. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश– सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र या दरम्यान चंद्र-राहू युती काही मानसिक त्रास निर्माण करु शकेल. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी अचानक काही खर्च उद्भवतील. नव्या गुंतवणूकीला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य नाही. तब्येतीची काळजी या दरम्यान घ्यावी.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. बढती किंवा पगारवाढ या काळात शक्य आहे. वरीष्ठांकडून एखादे काम करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी जरुर प्रयत्न करावेत. सप्ताह मध्यात थोडे जास्त काम करावे लागेल. गुप्तशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्या. सर्दी/ कफ़ाचा त्रास जाणवेल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीत सहभागी व्हाल. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थी, कलाकार व उपासक यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वाद टाळा. सोमवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. एखादी छानशी पार्टी घरात आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्य विमासंबंधी काम करणारे, इतिहासकार, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. गूढ विषयांकडे मन आकर्षित होईल. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही कालावधी चांगला आहे. लेखक, ब्लॉगर्स, कवी, कलाकार यांना चांगल्या कामाबद्दल लोकांची पावती मिळेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानक उद्भवतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. विद्यार्थ्यांना कालावधी प्रतिकूल आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज-मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. नोकरीमध्ये आपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखाद्या स्पर्धा-परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभ देणार्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदी कराल. घरासाठी किंवा घरातील वस्तूंच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध लाभस्थानात शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित भेटी होतील. आर्थिक लाभ होतील. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठीही ग्रहांची अनुकूलता आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रात छान काम झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)