अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवार लेखक, कलाकार, साहित्यिक यांना चांगला असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाणार आहेत. काहींना छान धनलाभ होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना नवीन संधी चालून येतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटत राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. ज्यांना ध्यानधरणा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. मात्र या काळात जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. आपला छंद किंवा आवडीचे एखादे पुस्तक वाचनात वेळ चांगला जाईल. नंतरचे दोन दिवस वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ यांच्यासाठी चांगले आहेत. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. हितशत्रूंवर मात्र या काळात नजर ठेवा. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, सर्जन यांना अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ शक्य.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. परदेशात ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचे आहे किंवा त्याबाबत काही माहिती मिळवायची असेल तर हा कालावधी चांगला आहे. प्रेमी जिवांना विवाह ठरविण्यास ग्रहांची अनुकूलता आहे सप्ताह मध्यात ग्रहमान प्रतिकूल आहे. आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आणि वरीष्ठांशी या काळात जमवून घेतलेलेच बरे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला सोशल मिडियावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. घरगुती वस्तूंच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतील. वादविवाद टाळावेत. घरातील शांतता बिघडणार नाही यासाठी या काळात प्रयत्न करावा लागेल. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. एखाद्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील तिकडे दुर्लक्ष करु नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. धनलाभाचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: गायक, वक्ते, रेडिओ जॉकी अशा संभाषणाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना संस्मरणीय यश यादरम्यान मिळू शकेल. आवडत्या लोकांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, साहित्यिक, कवी यांना हा काळ चांगला आहे. चांगले लेखन होईल. मन प्रसन्न असेल. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. भावंडांशी/ नातलगांशी संपर्क मनाला आनंद देईल. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लावू शकाल. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस एकप्रकारची चिंता किंवा हुरहुर मनाला लागून राहिल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र काळ उत्तम आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही आनंद देणार्या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. गूढ गोष्टींकडॆ मनाचा कल राहील. सप्ताह अखेरीस आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला आणि मुख्य म्हणजे वाहने सावकाश चालवा. सप्ताह अखेरीस लेखकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून या दरम्यान चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी घरासाठी वेळ काढावा लागेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. वरीष्ठांचं चांगलं सहकार्य लाभणार आहे. एखादी सवलत न मागता तुम्हाला यादरम्यान मिळू शकेल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. मध्यात धनलाभाचे योग आहेत. काही अडकलेली कामे अचानकपणे होऊन जातील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमची एखादी महत्वाकांक्षा किंवा इच्छा अपूर्ण राहिली असेल तर आता थोड्याशा प्रयत्नात इच्छापूर्तीचा आनंद तुम्ही मिळवू शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर कामात अडचणी जाणवतील. आपल्या चीजवस्तू सांभाळा. अचानक काही खर्चही उद्भवू शकतील. आरोग्याची काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. एखाद्या उत्सव किंवा समारंभात भाग घ्याल. मनासारखी खरेदी करु शकाल. विद्यार्थी, लेखक, कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. प्रवासयोग शक्य. नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल संधी चालून येतील. सप्ताह मध्यात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. उगीच विरोध करणे त्रासदायक ठरु शकेल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना हाच काळ उत्तम जाणार आहे. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र पैशांची कामे या काळात लांबण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस सोडला तर संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरतील. थोरामॊठ्यांचे सहकार्य व आशीर्वाद या काळात मिळतील. लाभ होतील. या काळात केलेले प्रवास चांगला फायदा मिळवून देतील. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. वरीष्ठ खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. काही लाभदायक घटना घडतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होईल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग व मंगळाशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सूचक स्वप्ने पडतील. वाहने जपून चालवावीत. काही मनाविरुध्द घटना या काळात शक्य. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. खेळाडू, ब्लॉगर्स तसेच सोशल मिडियाशी ज्यांचा संबंध आहे त्यांना विशेष अनुकूलता यादरम्यान जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वडीलधारी मंडळींचा सल्ला उपयोगी ठरेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)