अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. रविवार भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. मागील सप्ताहात ज्यांना तब्येतीच्या तक्रारी जाणवल्या त्यांना आता तब्येतीत सुधारणा दिसणार आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. काहींना लाभ संभवतात. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल. धार्मिक कार्यात मन रमेल. छान खरेदी होईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार कंटाळवाणा व अडथळ्याचा जरी असला तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारनंतरच्या दोन दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल. घरातील वडीलधारी मंडळींचा व कार्यक्षेत्रातील वरीष्ठांचा पाठींबा व मदत या काळात तुम्हाला मिळणार आहे. सप्ताहाचा मध्य व नंतरचा कालावधी धार्मिक कार्यक्रम/ उपासना करण्यास चांगला असणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. सप्ताह अखेरीस आवडती माणसे भेटतील. धनलाभाचेही योग आहेत. व्यवसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. मात्र व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो संध्याकाळपूर्वीच घ्यावेत. त्या नंतरचे चार दिवस स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. धार्मिक गोष्टींसाठी मात्र अनुकूल काळ आहे. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी म्हणजे शनिवारी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगली असेल. रविवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भाग्यवृध्दीकारक गोष्टी शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतील. नंतरचे चार दिवस फारसे अनुकूल नाहीत. तुमच्या स्वत:च्या व जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. कोणतेही आजार अंगावर काढू नका. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: वातामुळे ज्यांना त्रास किंवा आजारपण आहे त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय आज तुम्हाला आकर्षित करतील.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य तसा चांगला आहे. काहींना धनलाभाचे योग येतील मात्र त्यासाठी थोडी जास्त वाट पहावी लागेल. विद्यार्थ्यांनाही जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
उपासना: स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. घरातील साफसफाई किंवा गृहसजावटीसाठी वेळ काढाल. मात्र अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ संभवितात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश– सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. प्रेमिकांसाठीही चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व), लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. गृहसौख्य लाभेल. काहींना धनलाभ शक्य आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला असेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या पार्टीत किंवा समारंभात सामिल होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलेशी ज्यांचा संबंध आहे त्यांना विशेष चांगला कालावधी आहे. परदेशगमन किंवा त्यासंबंधीत काही कामे असतील तर त्याला गती देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्याच्या जोरावर काही लाभ मिळतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कवी, लेखक, ब्लॉगर्स यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल काळ आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे तसेच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती तर बुधाचा मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शुक्राशी केंद्रयोग आणि शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल तर बुध धनु राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपुर्ण सप्ताह छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल तसेच काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील. बेकायदा कोणतीही गोष्ट यादरम्यान करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)