अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषत: हातासंदर्भात किंवा सर्दी, थंडीमुळे होणार्या आजारांपासून जपायला हवे. शत्रुंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपले वरीष्ठ नाराज होणार नाहेत याची काळजी घ्या. सप्ताह मध्य खुप छान जाणार आहे. पती/ पत्नी बरोबर काही सुंदर क्षण अनुभवू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवावीत. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संततीकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय व्यवसाय करणारे यांना मात्र हाच काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना काही लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग आहेत. विमा व्यावसायिक, ज्योतिषी, इतिहासकार यांना अनुकूलता जाणवेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील कोणाचे आजार किंवा घरातील कोणाशी तरी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मन शांत ठेवणे हिताचे ठरेल. मालमत्ता विकत घ्यायची असेल तर कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घ्यावेत तसेच सर्व व्यवहार लेखी स्वरुपात असावेत. तोंडी व्यवहार नंतर त्रासदायक ठरु शकतील. सप्ताह मध्य खुपच छान आहे. आहारतज्ञ, कलाकार यांना चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यानंतर नोकरीत काही चांगल्या घडामोडी संभवतात मात्र छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रात अनुकूलता अनुभवाल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सप्ताह मध्य घरातील वातावरण प्रसन्न ठेवेल. एखादा पार्टीचा किंवा मेजवानीचा कार्यक्रम घरात ठेवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री करणार्या व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी/ कलाकार यांच्यासाठी थोडा अनुकूल काळ आहे. काही लाभही या काळात होतील. आवडती माणसे भेटतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. घरासंबंधी काही कामे असतील तर आता करुन घ्यावीत. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिक कामासंबंधीत केलेले प्रवासयोग लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे य़ोग येतील किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण छान असेल. पती/ पत्नीला जरुर वेळ द्यावा.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला जवळचे प्रवास संभवतात. भावंडांच्या/ नातलगांच्या भेटीचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक गोष्टींना वेळ द्याल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. काही आनंद देणार्या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा शेवट संमिश्र घटनांचा ठरु शकेल. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. या काळात कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्यांना मधूमेह आहे त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना मस्त धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकुल आहे. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर घरासाठी वेळ काढावा लागेल. काही चिंता किंवा हुरहुर सतावत रहातील. दगदग कमी करा. थोडी विश्रांतीही घ्या. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व), लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे विशेषत: ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना लाभदायक काळ आहे. परदेशगमनासाठी किंवा परदेशातील व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करणारे/ आहारतज्ञ यांना हा काळ विशेष चांगला आहे. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास असणार्यांनी मात्र यादरम्यान योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट आनंद देणारा ठरु शकेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कलाकारांना तसेच संगणकासंबंधी काम करणारे यांना ग्रहमान अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. काहींना मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सप्ताह मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोगही संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होणार आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला बुध व शुक्राची युती होईल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्राची बुध व शुक्राशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांअगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. चैन करावीशी वाटेल. विमा व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. तुमची धार्मिक मते दुसर्यांवर लाद्य़ नका. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)