अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे सामोरे येतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. वरीष्ठ दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र हा काळ उत्तम असणार आहे. सप्ताहाच्या मध्यात छान धनलाभाचे योग आहेत. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर चांगले ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या उत्तम नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. मात्र या दरम्यान आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. गुरुजनांचे/ वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सोशल मिडीयाच्या माध्यामातून यश संभवेल. लेखक, प्रकाशक, ज्योतिषी यांनाही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या मध्यात खर्च वाढणार आहेत. जोडीदारासाठी काही खरेदी कराल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात कटाक्षाने टाळाव्यात. याच काळात काहींना पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. छान लाभ होतील. मानसन्मान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. मनासारखे पैसे मिळतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. पैसे मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. या काळात कायदा मोडू नका अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागू शकेल. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. परदेशाशी ज्यांचे व्यवहार आहेत त्यांना काही फायदा संभवेल. ध्यानधारणा/ मेडीटेशनने मनाला शांती मिळू शकेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मधूमेह असणार्‍यांनी मात्र या काळात पथ्यपाणी सांभाळायला हवे. सप्ताह मध्यात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. काही धनलाभ अपेक्षित असतील तर ते मिळण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लेखक, कवी, साहित्यिक यांना छान काळ आहेत. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. वरीष्ठ तुमच्यावर या दरम्यान नवीन जबाबदारी सोपवू शकतात. हे काम तुम्हाला आनंद व सन्मान देऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटीसुध्दा काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. मात्र धार्मिक कार्यामधील सहभाग मनातील नकारात्मकता दूर करायला मदत करेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. मात्र तब्येतीची काळजी या काळात घ्यायला हवी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. हा काळ भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला नाही. भागीदाराबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर विचित्र घटनांची असू शकेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अचानक काही खर्च या काळात उद्भवू शकतील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान चांगलं आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मनाला सुखावून टाकेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे. काही लाभही या काळात होतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला सुखदायक काळ आहे. घरातील लोकांचे छान सहकार्य मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. संततिसौख्य लाभेल. काहींना आर्थिक लाभ शक्य. मात्र तब्येतीचे किरकोळ त्रास जाणवतील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास या काळात टाळावा. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना यशासाठी जास्त मेहनत घ्यायला लागेल. सप्ताह अखेरीस नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. हा काळ विद्यार्थ्यांना व खेळाडूंना विशेष अनुकूल आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काही लाभ मनाला आनंद देतील. प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. या काळात धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीची कामे करणार असाल तर थोडे थांबायला हवे असे ग्रहमान सांगत आहे. शनिवारी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. संततीचे काही प्रश्न असतील तर लक्ष द्यावे लागेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा सूर्य शुक्राशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- एकंदरीतच पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यार्‍या घटना संभवतात. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. सप्ताह मध्यही तुम्हाला अनुकूल असणार आहे. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखादा नवीन पदार्थ स्वत: बनवून बघायला हरकत नाही. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यानंतर प्रवासाचे योग संभवतात. लेखक, कलाकार व ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक काळ आहे. विवाह ठरविण्यासाठी कालावधी अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)