अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना यशदायक काळ आहे. वैद्यकीय क्षेत्र, जीम, आहारशास्त्र या क्षेत्रांशी ज्यांचा संबंध आहे त्यांना फायदे मिळवून देणारे ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्‍यांना अनुकूल दिवस आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेली कामे टाळावीत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल आहे. तब्येतीला जपा. आजारपण अंगावर काढू नका. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हाच काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी पती किंवा पत्नी बरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांकडून दर्जेदार लेखन होईल. चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतरचा काळ विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. कवी, लेखक, ब्लॉगर्स यांनी या काळात केलेल्या कामाची दखल लोक नक्की घेतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. गुप्त शत्रूंच्या कारवाया त्रास देतील. काळजी घ्यावी. बेकायदा गोष्टी टाळाव्यात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह एकदम छान जाणार आहे. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. तुमच्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. मानसन्मान मिळेल. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. सगळ्या गोष्टींमध्ये अनुकूलता जाणवेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात मस्त होणार आहे. अनुकूल ग्रहमान आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारची सकाळ खरेदीसाठी अनुकूल आहे. मनासारखी खरेदी होऊ शकेल. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ उत्तम आहे. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. कामे मार्गी लागतील. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. काही कौटुंबीक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील. सप्ताह अखेर घरात मस्त वातावरण असेल. मनोरंजनाकडे कल राहील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. वैहाहिक सौख्य मिळेल.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. नंतरचे दोन दिवस खरेदीसाठी चांगले आहेत. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक काही लाभ होऊ शकतील. अध्यात्मिक उन्नत्तीसाठी जे प्रयत्नरत आहेत त्यांना काही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य आनंदाचा व लाभदायक असेल. एखादा नवीन विषय किंवा कला शिकायला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. सप्ताह अखेरीस अती दगदग टाळावी. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले काहीही या अवधीत करु नका.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस आवडत्या लोकांच्या भेटीचे असतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काहींना एखादी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी चालून येईल. चांगले लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान आहे. रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी संपर्क साधाल. नंतरचे चार दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुष असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. राजकारणाशी ज्यांचा संबंध आहे त्यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. नवीन परीचय होतील. हे परीचय पुढे फायदेशीर ठरणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. बेकायदा गोष्टी टाळाव्यात. अचानक काही खर्च या काळात उद्भवू शकतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. नशीबाची साथ लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. कलाकार, लेखक, प्रकाशक यांनाही हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी अनुकूल काळ आहे. वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. काही लाभही या काळात अपेक्षित आहेत. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल असू शकतात. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. अचानक काही गोष्टींसाठी खर्च करावा लागू शकतो. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. प्रवासाचेही योग शक्य. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राची सूर्य, बुध व शुक्राशी युती तर गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोणयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, बुधाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल याचबरोबर शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार दुपारपर्यंत प्रतिकूल ग्रहमान आहे. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी मनाला आनंद देतील. भविष्यात फायदा देऊ शकणार्‍या एखाद्या गोष्टीची सुरुवात या कालावधीत होऊ शकेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरु करायला ग्रहमान अनुकूल आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यात जोखीम किंवा धोका असलेले काम टाळावे. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)