अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. स्पर्धा परीक्षा किंवा त्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना हा कालावधी चांगला आहे. मात्र संततीशी या काळात वाद होणार नाहीत याची या दरम्यान काळजी घ्या.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व), आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभ शक्य आहे. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. संततीबाबत चांगली बातमी कळेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना अनुकूल कालावधी आहे. काहीतरी चांगलं घडल्यामुळे खुश असाल. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर अखेरपर्यंत कायम रहाणार आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. एखादा विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर अत्यंत शुभ काळ आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. घरात दुरुस्ती/ सुशोभीकरण करायचं मनात घाटत असेल तर त्यासाठी आता योग्य वेळ आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल. तुमच्या संभाषण चातुर्याच्या जोरावर कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेरसुध्दा छान असणार आहे. आपल्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्यांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. परदेश प्रवास करण्यासाठीही अनुकूल कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र नवीन गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा कालावधी तितकासा चांगला नाही. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक, कलाकार, खेळाडू यांना अनुकुल काळ आहे. प्रवासाचेही योग आहेत.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काहींना धनलाभ संभवतात. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनअपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत. कुटुंबीयांबरोबर मौज-मजा कराविशी वाटेल. त्यासाठी वेळ जरुर काढा. असे वेचलेले काही क्षण आयुष्याची गोडी वाढवित असतात.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल, भाग्यस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मार्गी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. परदेशगमनासाठी अनुकुल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. खर्च या काळात वाढणार आहेत.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो. तुमच्या एखाद्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी लागू शकेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध(व), आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग मात्र टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल काळ आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध(व), आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भॆटवस्तु देऊन खुश करा. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धार्मिक गोष्टींनाही चांगला काळ आहे. मात्र आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका अती दगदग टाळा. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. आपली धार्मिक मते वेगळी असली तरी ती दुसर्यांवर लादू नका. मात्र सर्जन/ विमा व्यावसायिक/ संशोधक, खाजगी गुप्तहेर तसेच डेटा अॅनालिसिसचे काम करणार्यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थी व प्रेमिकांना प्रतिकूल कालावधी आहे. गुंतवणूक करतांना सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी व हर्षलशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी नवपंचम योग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २३ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)