अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध(व), सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. उपासनेत मन रमेल. पारमार्थिक उन्नती करणार्यांसाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे. तसेच आज केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यानंतर लाभदायक काळ आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्यासंबंधी मात्र काळजी या दरम्यान घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. योग्य ते प्रयत्न वरीष्ठांच्या सल्याने केल्यास काही महत्वाकांक्षा या काळात पूर्णत्वास जाऊ शकतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. उधारी वसूल होईल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना एखादी चांगली बातमी कळेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ एखादी शाबासकीची थाप मिळू शकते. राहत्या जागेचे किंवा व्यवसायिक जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रसिध्दीचेही योग आहेत. सप्ताह मध्य संमिश्र आहे. काहींना धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्या घटना शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. मात्र या दरम्यान एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस बेकायदा गोष्टींमध्ये अडकल्यास दीर्घकालीन त्रास संभवतो. काळजी घ्यावी. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग शक्य. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. शनिवारी सुखद घटना घडू शकतील.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीसच भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लाभदायक घटना शक्य. कामे मार्गी लागतील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. बुधवारी संध्याकाळी काही चिंता सतावतील. मात्र लगेच गुरुवार सकाळपासून ग्रहमानात अनुकूल बदल घडेल. त्यानंतर सप्ताह संपेपर्यंत चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात बुध(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. मात्र हाच काळ विमा सल्लागार, मानसोपचारतज्ञ, डेटा अॅनालिस्ट तसेच ज्योतिषी यांना फयदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोगही या काळात शक्य. सप्ताह मध्यानंतर व्यवसायात जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. शनिवारी लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध(व), धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल, भाग्यस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने जपून चालवा. मात्र इंशूरन्स एजंट व सर्जन यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन लागेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. खरेदीसाठीही हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व वकिलांना हा काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यानंतर वाहने सावकाश चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात बुध(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस/ भेटवस्तू/ प्रमोशन/ पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. आप्तेष्ट/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्तहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काही लाभ मनाला आनंद देतील. सप्ताह अखेरीस तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध(व), भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत एखाद्या खाऊगल्लीला जरुर भेट द्या. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग शक्य. असे प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यानंतर घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे दुर्लक्ष करु नका.
उपासना: ”श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा जप या काळात जास्तीत जास्त करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध(व), अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होइल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व शनिशी लाभयोग होइल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी युती होईल तसेच शुक्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या काळात येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)