अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात निर्यातीच्या व्यवसायात फ़ायदा होईल. नृत्यकलेशी संबंधितांनासुध्दा अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य. मनोबल वाढविणारी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. आपल्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू नये म्हणूनही योग्य ती काळजी घ्या. तसेच जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संध्याकाळपर्यंत मनाला काही चिंता सतावत असतील. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. त्यानंतरचे दोन दिवस उत्तम असणार आहेत. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. लोकांचे सहकार्य मिळेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात खर्च वाढणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवावे. रागाच्या भरात केलेली एखादी कृती नुकसानीची ठरु शकेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळणे या काळात गरजेचे आहे. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताह अखेरीस पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. आपल्या व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहेत. मनात बाळगलेली एखादी इच्छा किंवा महत्वाकांक्षा या काळात पुर्ण होण्यासाठी पूरक ग्रहमान आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. जोखीम असलेले कोणतेही काम या कालावधीत करू नका. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जातील. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय असल्यास काही फायदेशीर व्यवहार होऊ शकतील. प्रॉपर्टीसंबंधीत काही व्यवहार करायचे असतील तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने सावकाश चालवावीत. प्रवास शक्यतो टाळवेत. जोखीम असलेले कोणतेही व्यवहार या काळात नकोत. मूळव्याध किंवा उष्णतेच्या विकारांचा त्रास संभवतो. अती तिखट पदार्थ खाणे या काळात टाळवेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होईल. आवडत्या माणसांची भेट होईल.
उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, शुक्र आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्य व्यवस्थित पाळावे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. तसेच जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय या काळात घेऊ नका.
उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हाणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या तक्रारी असतील तर जास्त काळजी घ्यावी. हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडाशी संवाद साधाल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होईल. धनलाभाची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. लेखक, ब्लॉगर्स, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. या काळात हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या उत्तम नियोजनामुळे काही कामे मार्गी लागू शकतील. तुमच्या कार्याची प्रशंसा लोक करतील. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. खेळाडूंना उत्तम ग्रहमान आहे.
उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हाणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारी काही खरेदी कराल किंवा एखादा खर्च अचानकपणे पुढे येईल तो टाळता येणार नाही. मनाला एक प्रकारची विचित्र हुरहुर लागून राहील. डोळे किंवा दातांच्या समस्या या काळात जाणवतील. त्यानंतरचे दोन दिवस खूप चांगले आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या मध्यात तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सुयश मिळेल. काहींना प्रवास योग शक्य. सप्ताह अखेरीस घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीसंबंधीत काही कोर्टकेस सुरु असेल तर पुढची तारीख घ्यावी.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सूर्य-शनि प्रतियोग व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. १६ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शुक्र केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व गुरु-शुक्र त्रिकोण होईल. १९ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु व शुक्राशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात-निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सोमवार, मंगळवार हे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. मन प्रसन्न असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्य चांगला आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर डोळ्यांचे काही त्रास किंवा तोंड येणे असे उष्णतेचे त्रास संभवतात. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कळत नकळत लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त लेखन या दरम्यान सोशल मिडियावर शेअर करु नका. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांच्यासाठी काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)