अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ जुलै ते २३ जुलै २०२२)    

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, राहू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात निर्यातीच्या व्यवसायात फ़ायदा होईल. विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नका. या काळात राग, चीडचीड ही दीर्घकाळासाठी नुकसानदायक ठरु शकेल. काहींना या कालावधीत मायग्रेन, डोकेदुखी, पित्तविकारांचा त्रास होऊ शकेल. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. आपल्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत.  जुन्या मित्रांची भॆट शक्य आहे. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्य व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंतचा काळ आपल्याला फारसा अनुकूल नाही. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू नये म्हणून योग्य ती काळजी घ्या. पायाला दुखापत होऊ नये म्हणूनही काळजी घ्या. जोडीदाराशी वाद टाळावेत व जोडीदाराचे आरोग्य या काळात सांभाळावे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मन नैराश्येने ग्रासणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. मानसोपचार तज्ञ, इतिहासकार व विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना लाभदायक संधी चालून येतील. काही अनपेक्षित लाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर आपल्या कामात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे सहकार्य या काळात मिळणार नाही.  एखाद्या मित्राच्या/ आप्ताच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल. काही लाभ होता होता थांबू शकतील. सप्ताहाच्या अखेरीस जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. छान खरेदी करु शकाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.    
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल, राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. आपली व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना गुरु भेटणे किंवा काही चंगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करावेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्यावी. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचेही योग शक्य. मात्र दैनंदिन कामात अडचणी जाणवू शकतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. गुरुची किंवा वरीष्ठांची अवज्ञा करु नका. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल. लाभ होतील. आवडती माणसे भेटतील.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असल्यास काही फायदेशीर व्यवहार होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर अपघातभय आहे. प्रवास शक्यतो टाळवेत. जोखीम असलेले कोणतेही व्यवहार या काळात नकोत. मूळव्याध किंवा उष्णतेच्या विकारांचा ज्यांना त्रास आहे त्यांनी या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, भाग्यस्थानात शुक्र,  आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या सप्ताह अखेरपर्यंत घेऊ नका. तसेच सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका.  सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य.  
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल, राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करु नका. वाहने सावकाश चालवा.  
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. धनलाभाचेही योग काहींना आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात मित्र किंवा आप्तेष्टांबरोबर एखादी छानशी पार्टी किंवा गेट टुगेदर आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील आणि जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: काळभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.  
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. धनलाभाचे योग आहेत. लेखक, वक्ते, ब्लॉगर्स व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग आहेत. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्याची प्रशंसा लोक करतील. भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यानंतर घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास या काळात संभवू शकेल. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही खरेदी कराल किंवा काही खर्च अचानकपणे पुढे येतील. मनाला एक प्रकारची विचित्र हुरहुर लागून राहील. डोळे किंवा दातांच्या समस्या या काळात जाणवू शकतील. महत्वाच्या वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात काही अडचणी जाणवतील. सप्ताह मध्य उत्तम आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. धनलाभाचे योग आहेत. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर शक्यतो प्रवास टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांचे विचित्र अनुभव या काळात येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात मंगळ, हर्षल, राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू आणि  लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्र-मंगळ युती व चंद्र-शुक्र लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व  गुरुशी लाभयोग तर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्य चांगला आहे.  कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर डोळ्यांचे काही त्रास किंवा तोंड येणे असे उष्णतेचे त्रास संभवतात. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कळत नकळत लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त लेखन या काळात करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवासात काळजी घ्या. सप्ताह अखेरीस आनंद देणार्‍या काही घटना शक्य आहेत.  
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)