अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ जून ते २ जुलै २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, धनस्थानात बुध, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ चांगला जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना धनलाभ शक्य. कलाकारांना विशेषत: गायकांना चांगले काम यादरम्यान करता येईल. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. तुमच्या कुशल नियोजनामुळे एखाद्या कामात यश खेचून आणाल. प्रवासयोग शक्य. मन प्रसन्न असेल. भावंडांशी संपर्क होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. उपासनेत मन रमेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, शुक्र, धनस्थानात सूर्य, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात मंगळ, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना पती/ पत्नीच्या संदर्भातील शुभ वार्ता समजतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यावसायिकांचे निर्णय बरोबर ठरतील. आहारतज्ञ, योग प्रशिक्षक, ब्युटीशियन्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक यांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. संभाषणकौशल्याच्या जोरावर यश मिळवू शकाल. सप्ताह मध्यानंतर लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी ग्रहमानाची अनुकूलता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान संमिश्र आहे. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र काही खर्च अचानकपणे समोर येऊ शकतील. परदेशप्रवास किंवा परदेशाशी केलेल्या व्यापारातून फायदा होण्याची शक्यता आहे. नृत्यकलेच्या क्षेत्रातील लोकांना हा काळ यशदायक ठरेल. सप्ताहाच्या मध्यामधे बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. केलेल्या कामाचा मोबदलाही चांगला मिळणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, राहू, लाभस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. कलाकारांना व प्रेमिकांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. काही धनलाभ होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, राहू, दशमस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या फयदेशीर कामासाठी तुमची निवड होऊ शकते. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर काही अपेक्षित असलेले लाभ विनाकारण लांबण्याची शक्यता आहे. बेकायदा गोष्टी करणे टाळा. परदेशाशी संबंधीत काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि(व), सप्तमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, राहू, भाग्यस्थानात बुध, शुक्र आणि दशमस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. मात्र ईन्शुरन्सचे काम करणार्यांना मात्र चांगला कालावधी आहे. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, राहू, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर या काळात फ़ायद्याचे प्रमाण वाढेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास करणार असाल तर प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काही धनलाभ या काळात अपेक्षित आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, राहू, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य सामान्य आहे. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज तर नाही ना याची खतरजमा करुन घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी व्यवहार पारदर्शी ठेवावेत. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग शक्य.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, राहू, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात सूर्य आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मुलांबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थी व कलाकारांना यशदायक काळ आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र या काळात आपले आरोग्य सांभाळायचे आहे. खाण्यापिण्याची आबाळ यादरम्यान करु नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात हयगय करु नये. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, राहू, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. तुमची काही स्वप्ने/ इच्छा या काळात पूर्णत्वाला नेऊ शकाल. आईचा स्नेह मिळेल. घराच्या सजावट किंवा सुशोभीकरणासंबंधीत काही कामे ठरवली असतील तर त्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. सप्ताह मध्यात मुलांबद्दल चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना या काळात दैदीप्यवान असे यश मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती. सेवाकार्यात भाग घ्याल. मात्र या काळात आपले आरोग्य सांभाळायचे आहे. शनिवारी जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाणार आहे. जोडीदारासाठी हा प्रगतीदायक काळ असेल.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, धनस्थानात हर्षल, राहू, तृतीय स्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. २७ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल, मंगळाचा शनिशी लाभयोग तर चंद्राची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शनिशी त्रिकोण होईल. २९ तारखेला सूर्याची चंद्र-सूर्य युती होईल, गुरुचा सूर्य व चंद्राशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल, ३० तारखेला मंगळाचा चंद्राशी केंद्रयोग होईल आणि तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)