अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ मे ते ४ जून २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, राहू, धनस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात भाग्यवर्धक असेल. घरातील वातावरण आनंदी असेल. घरात एखादा छानसा कार्यक्रम किंवा पार्टी आयोजित करायला हरकत नाही. सप्ताहाचा मध्य प्रवासासाठी चांगला असेल. प्रवास फ़ायदेशीर ठरेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. धनलाभाचेही योग आहेत. लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. हातातील कामे लवकर संपवून आराम/ मौज-मजा करण्याकडे कल असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात मंगळ, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली असेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. मात्र आरोग्याच्या काही समस्या या दरम्यान जाणवतील. सप्ताहाचा मध्य खूप छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यापासून धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यावसायिंकांना यशदायक व फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संपर्क साधाल. लेखक, साहित्यिक व ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, लाभस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवातच एखाद्या छानशा धनालाभाने होईल. जुनी येणी वसूल होतील किंवा जुन्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी हा काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. खर्च वाढतील. बेकायदा व्यवहार टाळावेत. मात्र ज्यांना एखादी प्रॉपर्टी विकायची आहे त्यांचा फायदेशीर सौदा या काळात होऊ शकेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल किंवा जे उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत त्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा शेवट मिष्टान्न भोजनाचा असेल. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, दशमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. लाभ होतील. आवडती माणसं भेटतील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत नवीन उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी जरुर पुढाकार घ्यावा. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल मात्र कसली तरी चिंता मनाला लागून राहिलेली असेल. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट चांगला असेल. मन प्रसन्न असेल. कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. व्यावसायिकांना चांगले ग्रहमान आहे. ज्यांचा व्यवसाय वडिलार्जित किंवा पारंपारिक आहे त्यांना हा काळ विशेष फायदेशीर आहे. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे. खर्च वाढतील. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि भग्यस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल घटनांनी होऊ शकते. जोखीम असलेली कामे करू नका. कुटुंबियांशी वाद टाळा. धार्मिक गोष्टींसाठी मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाचा शेवट लाभदायक असेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावे. जोडीदाराच्या काही मागण्या असतील तर जरूर विचार करावा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला अंधारात ठेवून कोणतीही गोष्ट या काळात करु नये. अन्यथा त्याचे परीणाम दीर्घकालीन व नुकसान करणारे असू शकतील. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र काळ अनुकूल आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सप्ताहाचा शेवट आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल, राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. तुमच्यात व तुमच्या जोडीदारात काही वाद असतील तर ते वाढू देऊ नका. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेले कामे करू नका. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य. भाग्यवर्धक घटना घडतील. वरीष्ठांची मर्जी राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात वैद्यकीय व्यवसाय करणारे, फिजिकल फिटनेस क्षेत्रातील लोक, वकील तसेच फार्मासिस्ट यांना उत्तम फलदायी असेल. नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍यांना काही चांगल्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या दृष्टीनी हा काळ प्रतिकूल आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. जोडीदाराशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल ठरू शकतो. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. ज्योतिषी, इतिहासकार व मानसोपचारतज्ञ यांना मात्र हाच काळ यशदायक असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशदायी ग्रहमान आहे. सप्ताह मध्यातही काहींना धनलाभाचे योग आहेत. कर्जप्रकरणे मंजूर होतील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल वातावरण असेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अतिथंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल कालावधी आहे. घरात आनंदी वातावरण असेल. शेजार्‍यांचा एखादा चांगला अनुभव या काळात येईल. सप्ताह मध्यात कमी कष्टात जास्त पैसा मिळेल. एखादे बक्षिस किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, धनस्थानात शुक्र, हर्षल, राहू, तृतीय स्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. त्यानंतर २९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्र-बुध व मंगळ-गुरु या युत्या होतील. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर सूर्याशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी केंद्रयोग तर शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळ व गुरुशी त्रिकोण आणि शुक्राशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आनंददायक असेल. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रवासयोग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे. लेखक व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांची मदत मिळेल. सप्ताह मध्यामध्ये कौटुंबिक सौख्य लाभेल. खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. गृहसजावटीसाठी काही खर्च कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवट विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)