अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ मे ते १४ मे २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, हर्षल, राहू, धनस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. अतीश्रम किंवा दगदग या काळात टाळावी. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. काहींना धनलाभ होतील. संततीबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थी व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरदार लोकांना कर्मचार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीबदलासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना लाभदायक कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शनि, लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय उत्तम काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात सूर्य, हर्षल, राहू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर घराच्या दुरुस्ती किंवा सुशोभीकरणासाठी काही खर्च करावे लागतील. प्रॉपर्टी खरेदी/विक्रीची कामे काही दिवसांसाठी पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात सूर्य, हर्षल, राहू आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काही भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. सप्ताह अखेरीस भावंडांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, हर्षल, राहू आणि दशमस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक काही खर्च करावे लागतील. धार्मिक कृत्यांसाठी अनुकूल काळ आहे. मनाला एखाद्या गोष्टीची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्यात
भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर
उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. भावंडांशी वाद होणार नाहीत याचीही दक्षता या काळात घ्यावी.   
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात मंगळ, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, हर्षल, राहू आणि भग्यस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ होऊ शकतील. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील. सासरकडच्या नातेवाईकांच्या भेटी होतील. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शनि, षष्ठस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात काही बाबतीत लाभदायक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. कोणाशी झालेला वाद त्रासदायक ठरु शकेल. काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, हर्षल, राहू, सप्तमस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याचीही दक्षता घ्या. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. आरोग्याकडे दूर्लक्ष या काळात करु नका. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. विवाहोत्सूकांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.  
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, हर्षल, राहू, षष्ठस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
रविवारी काही चिंता मनाला जाणवत रहातील. काहींना गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक गोष्टींसाठी व प्रवासासाठी अनुकूल आहेत. भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात मंगळ, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, हर्षल, राहू, पंचमस्थानात बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
रविवारी आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. वरीष्ठांकडून कौतूक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग शक्य.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून  तृतीयस्थानी सूर्य, हर्षल, राहू, चतुर्थस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कोणत्याही वादात पडू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्‍यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. धनलाभाचेही योग शक्य.  
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात सूर्य, हर्षल, राहू, तृतिय स्थानात बुध, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शनि अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्य-चंद्र केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्र-शनि प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्य-मंगळ प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काहींना धनलाभही शक्य. सप्ताह मध्य नोकरदार मंडळींसाठी अनुकूल मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. प्रवासयोग येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. प्रेमिकांनाही हा कालावधी अनुकूल आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)