अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ एप्रिल ते ९ एप्रिल २०२२)    

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्पादक किंवा कारखानदार यांच्या वस्तूंना चांगली मागणी येईल. मात्र आपल्या बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही धनलाभ होतील. आपला एखादा स्नेही/ नातेवाईक किंवा आवडती व्यक्ती भेटल्याने मन आनंदी असेल. लेखक, ब्लॉगर्स व गायकांना हा कालावधी उत्तम आहे. मौज मजेचे प्रसंग घडतील. सप्ताहाच्या शेवटी घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. घरासंबंधीच्या कामांसाठीही चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. धार्मिक कार्यात सहभाग असेल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ कामावर खुष असतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. गायक, वक्ते, आहारतज्ञ व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक व खेळाडूंना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी संमिश्र असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. या काळात वाहने सावकाश चालवावीत. मात्र याचदरम्यान काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस गायकांना व नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना खुप सुंदर कालावधी आहे. काही चांगल्या संधी चालून येतील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. मात्र खर्च वाढणार आहेत. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरीत किंवा व्यवसायात समाधानकारक स्थिती असेल. महत्वाचे निर्णय मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनासारखं काम झाल्याने खूष असतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. जोडीदाराचे अपेक्षीत सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. इतिहास, मानसशास्त्र, परामानसशास्र, ज्योतिषशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि भाग्यस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र या काळात अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. धनलाभ होईल. मात्र एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्ताहाच्या शेवटी छान खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि अष्टमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. हा योग नोकरीबदल किंवा बदलीसाठी अनुकूलता देत आहे. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, बुध आणि सप्तमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. सप्ताह मध्य विमा व्यावसायिक, इतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे योग शक्य. मात्र या काळात वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु,  शुक्र, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. घरात छान पार्टीचे वातावरण असेल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. काहींना सूचक स्वप्न पडतील. ज्योतिषशास्त्र, रेकी किंवा तत्सम गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकीत करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु,  शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात हर्षल, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी आहे. मन आनंदी राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे व केमिस्ट यांना अनुकूल आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे टाळावीत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु,  शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात हर्षल, राहू आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज-मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला दाद मिळेल. मानसन्मान मिळेल. कौटुंबीक सौख्याचा हा काळ असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. विद्यार्थ्यांनाही हा काळ अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यानंतर कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग शक्य. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी हर्षल, राहू, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांनी आपले लेखन वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. शेजार्‍यांचा विचित्र अनुभव या काळात येऊ शकेल. मात्र या कालावधीत परदेशासंबंधी केलेल्या व्यवहारात फायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यात घरात छान वातावरण असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. एखादी स्पर्धा/ परीक्षा असेल तर त्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी जास्त दगदग किंवा श्रम टाळा. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मात्र त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात हर्षल, राहू, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर अनुक्रमे मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनि- मंगळ युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला बुध मेषेत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वेळ छान जाईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. मात्र परदेशगमन किंवा परदेशाशी संबंधीत गोष्टींसाठी हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर घरात चांगले वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. एखाद्या नवीन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)