अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ मार्च ते २ एप्रिल २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- पूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटी किंवा संपर्क आनंददायी ठरतील. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आयात-निर्यातीच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना जास्त चांगले ग्रहमान आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होईल. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ होऊ शकतो. एखद्या मित्र किंवा नातेवाईकाशी झालेला संपर्क मनाला उभारी देईल. या काळात गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात तितकीशी चांगली असणार नाही. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहा. मनाविरुध्द घटना शक्य आहेत. नियोजित कामांमध्ये दीरंगाई होईल. मनात येणार्‍या निराशाजनक विचारांना बाजूला सारा. ध्यानधरणा किंवा मेडीटेशन नक्की करा. हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांना मात्र अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. सप्ताह अखेरीस जोडीदाराबद्द्ल चांगली बातमी कळेल. विवाहोत्सुक लोकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे.  
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस वडीलधारी मंडळींशी वाद संभवतात. तुमच्या कार्यक्षेत्रात वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.  
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि भाग्यस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना व वकिलांना मात्र हा काळ चांगला आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करीत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची या कालावधीत पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेर मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि अष्टमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वाद टाळावेत. घरातील वातावरण बिघडू देऊ नका.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, बुध आणि सप्तमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. हातातली कामे पटकन आटोपून आराम करण्याकडे कल असेल. घराची किंवा घरगुती एखाद्या गोष्टींची तातडीची दुरुस्ती करावी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना अनुकूल आहे. चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना मात्र हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात हर्षल, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात हर्षल, राहू आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्‍या काही घटना शक्य आहेत. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांनी भरलेला असेल. कलाकारांसाठी विशेषत: नृत्यकलाकारांना भरीव यश संभवते. निरनिराळे लाभ या काळात होतील. सप्ताहाचा शेवट कलाकार/ कवी यांना चांगला आहे. तुमचं नियोजन, कल्पकता याच्या जोरावर यश मिळेल. लाभ होतील. प्रवासयोग येतील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी हर्षल, राहू, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. अचानक काही खर्चही या काळात उद्भवू शकतील. कलाकारांना मात्र चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात उगीचच काही गोष्टींची चिंता मनाला लागून राहील. बेकायदा गोष्टींपासून या काळात लांबच राहीलेले बरे. आपली एखादी वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह अखेरीस मित्रमंडळी/ आवडत्या लोकांची भेट होऊ शकेल. एखादा धनलाभ सुखावून टाकेल. गोडधोड खायला मिळेल. तुमच्या राशीचे लोक खरे खवय्ये असतात. नवनवीन पदार्थ बनविणे आणि त्याचा आस्वाद घेणे आपल्याला आवडते. एखादा छान पदार्थ या काळात करुन बघायला हरकत नाही.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात हर्षल, राहू, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनिशी तर शुक्राची शनिशी युती होईल. ३० तारखेला चंद्राची गुरुशी युती व हर्षलशी लाभयोग होईल. ३१ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती तर मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला बुधाशी सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. उपासना करण्यार्‍यांनाही चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ विशेष चांगला आहे. त्यातही वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्‍यांना जास्त फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. आपल्या चीजवस्तू सांभाळा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)