अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० मार्च ते २६ मार्च २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात बुध, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. मात्र हाच काळ इतिहासकार, सर्जन, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी आणि विमा व्यावसायिकांना खूप फायदेशीर ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच न्यायाधीश यांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात बुध, गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्यात अडथळे येऊ शकतत. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना व वकीलांना हा काळ संमिश्र आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी हा काळ फ़ारसा अनुकूल नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला चांगले ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यात प्रगती संभवते. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. मात्र ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात बुध, गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात बुध, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात हर्षल राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. एखाद्या उत्सव/ समारंभात भाग घेऊ शकाल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे  सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले यश मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. उपासना, ध्यानधारणा मनाप्रमाणे होईल. काही अध्यात्मिक अनुभव शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील तसेच फ़िजिकल फ़िटनेससंबंधी काम करणारे लोक यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात बुध, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य आणि भाग्यस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र दिवस आहे. आर्थिक व्यवहार शक्यतो रविवारी दुपारपूर्वीच उरकून घ्या. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते या काळात वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. शेजार्‍यांशी किंवा भावंडांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. प्रवास करावेच लागणार असतील तर योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी  अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा नित्य जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात बुध, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य आणि अष्टमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना यशदायक कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताह अखेर रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास ?
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, पंचमस्थानात बुध, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य आणि सप्तमस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. प्रवास करणार असाल तर आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. एखादा अनपेक्षित खर्चही करावा लागू शकेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना काही नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.  
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी बुध, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात हर्षल,  राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम होइल. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. दैनंदिन कामे रेंगाळतील. मात्र खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. काहींची जुनी येणी वसूल होतील.
सप्ताहाचा शेवट मनाला आनंद देणार्‍या घटनांचा ठरु शकेल. प्रवास फयदेशीर ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात बुध, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात हर्षल, राहू आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. वरीष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, नेपचून, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी हर्षल, राहू, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.   वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना मात्र हाच काळ अनुकूल ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.  उच्चपदस्थ व्यक्तींच्या ओळखीमुळे कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात हर्षल, राहू, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला गुरुचा चंद्राशी त्रिकोण व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्याशी व बुधाशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी व गुरुशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी तसेच विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सुचक स्वप्ने पडू शकतील. अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस संमिश ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र या काळात अती आत्मविश्वास महागात पडू शकेल.  
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)