अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ मार्च ते १९ मार्च २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द मनाला आनंद देतील. प्रेमिकांना हा काळ चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक निर्णय बरोबर ठरतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रॉपर्टीच्या कामातही यश संभवते.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- रविवारी दुपारपर्यंत वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंतच्या काळ चांगला आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यात काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. खाद्यपदार्थ विक्रेते तसेच आहारतज्ञ यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस लेखक, ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लेखन टाळावे. नियोजनाअभावी काही कामे अर्धवट राहू शकतील. भावंडांशी वाद टाळा. प्रवासत योग्य ती काळजी घ्या. ज्योतिषशास्त्र किंवा त्यासारख्या गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात आत्मविश्वास वाढविणारं ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. कार्यक्षेत्रात मनासारखं काम होईल. वरीष्ठ खुश असतील. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात बेकायदा किंवा जोखीम असलेली कामे करु नका. कायद्याचं पालन करा. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने ते खु्श असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांनाही चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना लाभदायक काळ आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल कालावधी आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा ठरु शकेल. जोखीम असलेली कामे अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ अनुकूल आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही काहींना शक्य. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ देणार्या गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कुठलेही काम करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. १५ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला राहू मेषेत व केतू तुळेत प्रवेश करतील आणि चंद्राचा अनुक्रमे बुध व गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ, शुक्र व शनि यांच्याशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)