अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी दुपारनंतरचा आणि सोमवार सकाळपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना लाभ संभवतात. मित्रांची काही कामात मदत मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ संभवतो. जुने येणे वसूल होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार कंटाळवाणा व अडथळ्याचा जरी असला तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुम्ही खुश असाल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांसाठी चांगला असणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. वरीष्ठांची तुम्हाला चांगली साथ मिळेल. सप्ताह अखेरीस आवडत्या लोकांशी संपर्क होईल. धनलाभाचे योग आहेत. व्यवसाय करणार्‍यांना विशेष अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल.  २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांचा असेल. त्या नंतरचे चार दिवस स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम करु नये. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सर्जन, ज्योतिषी मानसोपचारतज्ञ, इतिहासकार यांना मात्र हा कालावधी फायदेशीर ठरु शकेल. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या वरीष्ठांच्या नाराजीला कारण ठरेल असे कृत्य़ आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिक्षण क्षेत्रातील लोकांना काही नवीन कल्पना राबविता येतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात चांगली असेल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. वकीलांना चांगला फायदा मिळवून देणारं अशिल मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. वैहाहिक सौख्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कोणतेही आजार अंगावर काढू नका. जोखीम असलेली कामे सध्या नकोत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे मनाचा कल असेल.  वडीलधारी मंडळी किंवा वरीष्ठ यांच्याशी या काळात वाद टाळावा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनी एखादी संधी मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराला जपा.  
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात काही कुरबुरी/ कटकटी होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सप्ताहाचा मध्य चांगला आहे.  काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळावा. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वातविकार असतील तर आवश्यक ते पथ्य-पाणी या काळात सांभाळलेले बरे. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.  
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कलाकारांना व लेखकांना चांगला काळ आहे. काहीतरी छान काम या काळात होऊ शकेल. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील साफसफाई किंवा गृहसजावटीसाठी वेळ काढाल. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ संभवितात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, बुध, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेरीस घरात वातावरण आनंदी असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात काही कटकटींनी होऊ शकेल. काही अनावश्यक खर्च किंवा खरेदी होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाचा मध्य चांगला असेल. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा शेवट कवी, लेखक यांच्यासाठी चांगला आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग शक्य आहेत.
उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.  
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. आपल्या चीजवस्तू सांभाळा. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. सप्ताहाच्या शेवटी आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे वरीष्ठांना खुश करु शकाल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात मंगळ, बुध, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्र अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी युती व नेपचूनशी लाभयोग करेल. २८ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची सूर्याशी व गुरुशी, मंगळाची प्लूटोशी व बुधाची शनिशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, मंगळ व प्लूटोशी लाभयोग होईल. ५ तारखेला सूर्याशी गुरुशी युती तर चंद्राचा बुध व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला दैनंदिन कामे रेंगाळतील. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. आपले काम या काळात चोख ठेवा. व्यावसायिकांनी फायदा-तोट्याचे भान ठेऊनच व्यवहार करावेत. खरेदीसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नवीन फायदा देणार्‍या संधी उपलब्ध होतील. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून चांगल्या धनलाभाची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर छान खरेदी होईल. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)