अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात बुध, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- रविवार लेखक, कलाकार, साहित्यिक यांना चांगला असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाणार आहेत. काहींना छान धनलाभ होईल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटत राहील. ज्यांना ध्यानधरणा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. मात्र या काळात जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात बुध, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- रविवारी एखादी गोष्ट मनाला आनंद देईल. आपला छंद किंवा आवडीचे एखादे पुस्तक वाचनात वेळ चांगला जाईल. नंतरचे दोन दिवस वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ यांच्यासाठी चांगले आहेत. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. हितशत्रूंवर नजर ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत तसेच जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी लागेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना जोडीदाराचा विरोध सहन करावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, सर्जन यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात बुध, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही खरेदी किंवा दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतील. घरातील शांतता बिघडणार नाही यासाठी प्रयत्न करावा लागेल. वादविवाद टाळावेत. परदेशात ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचे आहे किंवा त्याबाबत काही माहिती मिळवायची असेल तर हा कालावधी चांगला आहे. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. शेअर्ससारख्या व्यवहारांपासून मात्र सध्या लांबच रहावे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: रोज ३ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात बुध, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी/ नातेवाईकांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. कागदपत्रांसंबंधीची कामे मार्गी लागतील. चांगल्या नियोजनामुळे यश मिळेल. विवाह ठरविण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण आपल्या बोलण्यामुळे बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासात चालढकल करु नका. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य आहेत
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात बुध, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, कलाकार व खेळाडू यांना हा काळ विशेष चांगला आहे. तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर घरातील प्रलंबीत असलेली कामे करावी लागतील. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात बुध, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खूश असाल. भावंडांशी/ नातलगांशी संपर्क मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. प्रवास करणार असाल तर प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. कुणाशीही वाद होणार नाहीत म्हणून जपा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस एकप्रकारची चिंता किंवा हुरहुर मनाला लागून राहील. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र काळ उत्तम आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. धनलाभाचेही योग या काळात शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस लेखकांना अनुकूल काळ आहे. भावंडांची प्रगती होईल.
उपासना: या काळात गणपतीस्तोत्र नित्य म्हणावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी बुध, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. सप्ताहाच्या मध्यानंतर घरात प्रसन्न वातावरण असेल. करमणूकीच्या कार्यक्रमांमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी घरासाठी वेळ काढावा लागेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभाचे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, धनस्थानात बुध, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचं आपल्याला चांगलं सहकार्य लाभणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यातही धनलाभाचे योग आहेत. काही अडकलेली कामे अचानकपणे होऊन जातील. मित्रांच्या किंवा आवडत्या माणसांच्या भेटीने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून फायदा संभवितो. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात बुध, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना शक्य आहेत. खर्च वाढतील. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ शक्य आहेत. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. मित्र किंवा मैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. काही लाभही होतील. धार्मिक गोष्टींसाठीसुध्दा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्यातील आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. वरीष्ठ खूश असतील. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी काही लाभदायक घटना घडतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, लाभस्थानात बुध, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी केंद्रयोग तर शनिशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला शनि उदीत होईल, चंद्राचा गुरुशी केंद्रयोग आणि बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. धनलाभाचे योग आहेत. पती/ पत्नीची प्रगती होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. एखादे नको असलेले काम अंगावर येऊन पडण्याची शक्यता आहे. या काळात वाहने जपून चालवावीत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट खर्चाचा ठरु शकेल. आयात-निर्यातीशी संबंधीत असणार्‍यांना मात्र हा कालवधी चांगला आहे.
उपासना: पांडुरंगाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)