अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. जोडीदाराविषयी एखादी चांगली बातमी कळू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी मनाला आनंद देतील. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी उपासनेसाठी अनुकूल काळ आहे. छान खरेदी कराल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे तसेच वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ काढा. सर्जन व विमा व्यावसायिकांना मात्र हाच काळ लाभदायक आहे. त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगले आहेत. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुश असतील. सप्ताहाचा शेवट लाभदायक असेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल.
उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. त्यानंतरचे चार दिवस मात्र फारसे अनुकूल नाहीत. या काळात घरच्यांबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे सध्या नकोत. रागावर नियंत्रण ठेवा. वाहने जपून चालवा. मात्र हाच काळ मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी व विमा सल्लागार यांना फायदेशीर ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक निर्णय बरोबर ठरतील.
उपासना: दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. स्पर्धा परीक्षेमध्ये यश संभवते. नवीन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात वादविवाद टाळावेत. जोडीदाराला जपावे. त्यांच्या तब्येतीविषयी काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. ज्यांना अॅसिडीटी किंवा पोटाचे विकार असतील त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. अती मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. काहींना भाग्यवर्धक घटना चकीत करतील. मात्र जोखीम असलेली कामे करु नका. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांना हा संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संततीसौख्य लाभेल. मन आनंदी असेल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटनाही शक्य. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान विरोधी आहे. तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतील. संधीवात, ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी. वकील व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र हा अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह अखेर वाहने हळू चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना काही संधी चालून येण्याची शक्यता आहे. वकील, फिजिओ थेरपिस्ट यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सांधेदुखी किंवा हाडांसंबंधी काही आजार असतील तर या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळाणे आवश्यक आहे. या काळात गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला भावंडांशी संपर्क होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला छान वाव मिळेल. लेखक, ब्लॉगर्स, कवी, गायक यांना लोकांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. प्रवासयोगही या काळात शक्य आहेत. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला आहे. घरातील काही दुरुस्तीची कामे प्रलंबीत असतील तर आता त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे मात्र यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. कमोडीटी, शेअर मार्केट किंवा तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक सध्या नुकसानीची ठरु शकेल. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांना सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
उपासना: दत्तउपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कौटुंबीक सौख्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभाची प्राप्ती होईल. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासाचे योग शक्य आहेत. मात्र आवश्यक असेल तरच प्रवास करावा. सप्ताह मध्यानंतर घरातील वातावरण छान असेल. हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीसंबंधी कामे करणार्यांनाही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. काही नवीन शिकायचं असेल तर जरुर शिका. ग्रहमानाची त्यासाठी नक्कीच साथ आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होईल. मन प्रसन्न असेल. घरात आपल्या आवडीच्या पदार्थांची रेलचेल असेल. घरातील वातावरण चांगले राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग आहेत. भावंडांशी संपर्क साधाल. लेखक/ ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे. हातून चांगले काम घडेल. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणार्यांना या काळात एखादा चांगला फायदा होऊ शकेल. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारच्या दिवशी धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मात्र अती दगदग या काळात करु नका. सप्ताह मध्य आत्मविश्वासात वाढ करविणारा असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस अनुकूल कालावधी आहे. काही लाभाचे प्रसंग घडतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक घटना शक्य आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खरेदी किंवा अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च करावा लागेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. सप्ताह अखेर लाभदायक असणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला शुक्र व चंद्र यांची युती होईल. ३१ तारखेला बुध व चंद्र यांची युती होईल. १ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्य व शनिशी युती होईल. २ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल याचबरोबर मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग तर चंद्राचा मंगळ व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. भाग्यवर्धक काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रमंडळींच्या भेटी घडू शकतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र काळ अनुकूल आहे.
सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)