अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ जानेवारी ते २९ जानेवारी २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र(व), दशमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. मात्र असे असले तरी वरीष्ठ तुमच्या चुका शोधण्याचाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर सध्या काही दिवस थांबावे. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मुख्य म्हणजे या काळात वाहने सावकाश चालवावीत. शनिवारी काही लाभ संभवतात. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, केतू, अष्टमस्थानात शुक्र(व), भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. घरातील वडीलधारी मंडळींचं सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना हा काळा छान यशाचा आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. सप्ताहाच्या मध्यात नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक धनलाभाचे योग काहींना या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. भागीदारीसाठी काही प्रस्ताव या काळात आले तर ते लगेच स्वीकारु नका. शनिवारी प्रवास करणार असाल तर प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. विमा व्यावसायिकांना मात्र शनिवारचा दिवस लाभदायक आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात मंगळ, केतू, सप्तमस्थानात शुक्र(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात त्रासाची व कंटाळवाणी असण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. निराशावादी विचार मनात येतील. पण काळजी करु नका ही ग्रहस्थिती तात्पुरती आहे. सप्ताह मध्य उत्तम असेल. काहींना धनलाभ होतील. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. नित्योपासना किंवा धार्मिक गोष्टींमधून मनाला शांतता मिळेल. मानसन्मानाचे योग आहेत. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक ठरु शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानात शुक्र(व), सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील किंवा त्यांची खुशाली कळेल. शेजार्‍यांचा एखादा चांगला अनुभव येईल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. विवाहोत्सुक मंडळींना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामासाठी प्रतिकूल काळ आहे. घरात वाद होणार नाहीत याची दक्षता या काळात घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, केतू, पंचमस्थानात शुक्र(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सध्या नकोत. वकील, फ़ार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त जवळचे प्रवास शक्य आहेत. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. आर्थिक सुयश लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात मंगळ, केतू, चतुर्थस्थानात शुक्र(व), पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमान अनुकूल आहे. संपूर्ण सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. कलाकारांसाठी हा काळ खुप चांगला आहे. लोकांच्या कौतुकास पात्र ठरणारे काम घडेल. प्रॉपर्टीच्या कामासही चांगला काळ आहे. एखाद्या कामात चांगला लाभ संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग येतील. भावंडांशी संवाद साधाल. शनिवारी घरात वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, केतू, तृतीयस्थानी शुक्र(व), चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात थोडी प्रतिकूल आहे. वाद-विवाद टाळावेत. घरातील शांतता बिघडेल असे विषय सध्या टाळलेले बरे. ज्यांना श्वसनाचा/ दम्याचा त्रास आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घेतलेली बरी. घरासंबंधी काही दुरुस्ती बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाचा मध्य लेखक, ब्लॉगर्स, कलाकार, प्रकाशक यांच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या छंदांना जरुर वेळ द्या. कागदपत्रांसंबंधीत कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक काळ आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा या काळात रोज म्हणावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, केतू, धनस्थानात शुक्र(व), तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होऊ शकतील. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. अपेक्षित ठिकाणी खातेबदल किंवा बदली संभवते. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांनाही कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र(व), धनस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- हा पूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाची सुरूवात चागल्या घटनांची असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात पुन्हा काही छान लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी संपर्क साधाल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, केतू आणि व्ययस्थानात शुक्र(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात व नंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. नृत्यकलाकारांना ग्रहमान खूप चांगले आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. खरेदीसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभ होतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात शुक्र(व) आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असेल. महत्वाचे निर्णय शक्यतो या काळात घेऊ नका. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. कलाकारांना खूप चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतरसुध्दा लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात शुक्र(व), लाभस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल तर गुरुशी त्रिकोण होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. धनलाभाची शक्यता आहे. मित्र भेटतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी काही प्रस्ताव आले व ते फायदेशीर असतील तर जरूर स्वीकारा. ग्रहमानाची साथ त्यासाठी आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहनेही सावकाश चालवा. सप्ताहाच्या मध्यानंतर भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगली ठरेल.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)