अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात शुक्र(व), दशमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपली कल्पनाशक्ती आपल्याला चांगली साथ देणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. आपलं कौतुक या काळात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना कमी श्रमात जास्त यश देणारं ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस नोकरीच्या शोधात असणार्यांना सुसंधी प्राप्त होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, केतू, अष्टमस्थानात शुक्र(व), भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ असेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, प्रकाशक, वक्ते यांना ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. नवनवीन कल्पना सुचतील. भविष्याबद्दल नवीन धोरणं ठरवाल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळणार आहे. धार्मिक गोष्टी मनाला समाधन देतील. सप्ताहाच्या शेवटी बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात मंगळ, केतू, सप्तमस्थानात शुक्र(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहात सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. ध्यानधारणा/ मेडीटेशन या काळात उपयोगी पडू शकेल. सप्ताह मध्यात धनलाभाचे काही योग संभवतात. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला आवडते. कुटुंबीयांबरोबर हा काळ छान व्यतीत कराल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यानंतरचा काळ मात्र सावधानता बाळगायला सांगत आहे. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या गोष्टी या काळात कटाक्षाने टाळाव्यात. सोशल निडीयावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होऊ देऊ नका.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानात शुक्र(व), सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. जोडीदारासाठी खर्च करावा लागेल. जोडीदाराच्या तब्येतीलाही या काळात जपायला हवे. मात्र परदेशाशी ज्या व्यापार्यांचा संबंध आहे त्यांना फायदा देणार्या काही संधी मिळू शकतील. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडणार आहे. लेखक व वक्त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. आपली काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, केतू, पंचमस्थानात शुक्र(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींशी किंवा आप्तेष्टांशी संपर्क होईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल असेल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील. मनाचा तोल जाणार नाही याची या काळात काळजी घ्यावी. मेडीटेशन/ धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवलेले चांगले ठरेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. संपूर्ण सप्ताहात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात मंगळ, केतू, चतुर्थस्थानात शुक्र(व), पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. काहींना धनलाभ शक्य आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, केतू, तृतीयस्थानी शुक्र(व), चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा वरीष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्र किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर वाद टाळावा. अचानक एखादा खर्च या काळात करावा लागू शकतो.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, केतू, धनस्थानात शुक्र(व), तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही आजार असतील तर अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. नोकरीत किंवा व्यवसायात कामाच्या तुलनेत मोबदला चांगला मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र(व), धनस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती पुन्हा अनुकूल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काही धनलाभही होतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, केतू आणि व्ययस्थानात शुक्र(व) अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अती दगदग टाळा. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच वकीलांना हा काळ चांगला ठरेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काहींना फ़ायदा मिळू शकेल. नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह मध्य चांगला आहे. आवडत्या लोकांबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांनाही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतरचा काळ संमिश्र असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह अखेर धार्मिक गोष्टींसाठी चांगली ठरेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात शुक्र(व) आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारा कालावधी आहे. गुंतवणूक करतांना मात्र सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात शुक्र(व), लाभस्थानात सूर्य, बुध(व), शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्याची प्लूटोशी युती व चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)