अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ जानेवारी २०२२ ते १५ जानेवारी २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे. नंतरचे दोन दिवस मात्र प्रतिकूल असू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. महत्वाचं म्हणजे या काळात वाहने सावकाश चालवावीत. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासयोगही संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कळतील. भागीदारीबद्दलचे काही प्रस्ताव आले आणि जर ते आपल्याला अनुकूल असतील तर ते स्विकारायला हरकत नाहीत. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी काळ चांगला आहे. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊन खुश करु शकाल. सप्ताहाचा शेवट भाग्यदायक ठरेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन लागेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पगारवाढ किंवा उन्नतीसाठी वरीष्ठांकडॆ शब्द टाकायचा असेल तर त्यासाठी हा उचित कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या मित्राच्या किंवा परीचिताच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. आरोग्याच्या दृष्टीने हा थोडा नाजुक काळ असू शकतो. पोटाचा किंवा पित्तासंबंधी काही त्रास असेल तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अचानक काही खर्च उभे राहू शकतात. जोखीम असलेली कामे टाळावीत.
उपासना: दत्तबावन्नी या काळात म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. नवीन तंत्रज्ञान किंवा कार्यक्षेत्राशी निगडीत काही ट्रेनिंग/ शिक्षण घेण्यासाठी हा कालावधी महत्वाचा असेल. संततीसंबंधी काही महत्वाच्या घडामोडी यादरम्यान शक्य आहेत. सप्ताह मध्यात संमिश्र कालावधी आहे. काही लाभ होतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी मनाला आनंद देऊ शकतील. मात्र याच दरम्यान तुमच्या हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कोर्टकचेरीसंबंधी निर्णय़ थोडे पुढे ढकलणे इष्ट. सप्ताहाचा शेवट खर्च वाढविणारा असू शकेल. आयात-निर्यातीच्या व्यवसायासाठी मात्र हा कालावधी अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही चांगले अनुभव येऊ शकतील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
रविवारी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे असू शकतील. प्रवासाबाबत मनात बेत घोळत रहातील. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात चांगलं काम केल्याबद्द्ल वरीष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल. संततीबद्दल काहीतरी चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. हा काळ कलाकार, विद्यार्थी यांना खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही कामे किंवा काही लाभ होता होता राहू शकतील. मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. आरोग्यासंबंधी काही कुरबुरी जाणवतील.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
रविवारी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल कालावधी आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. त्यानंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. जोखीम असलेली कोणतेही काम या काळात करु नका. वाहने सावकाश चालवा. मात्र हा काळ ज्योतिषी, मानसोपचार तज्ञ, खाजगी गुप्तहेर, सर्जन तसेच शास्त्रज्ञ यांना अनुकूल असणार आहे. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. एखादं बक्षिस किंवा भॆटवस्तू या काळात मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी संततीची प्रगती चांगली असेल. खेळाडूंना छान कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना कालावधी चांगला आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. पगारवाढ, बढतीसाठी या काळात जरुर प्रयत्न करा. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी उत्तम आहे. सप्ताह मध्यानंतर गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. अचानक धनलाभाचे काहींना योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. मुलांसाठी वेळ जरुर द्यावा. एखादा विषय शिकायला सुरुवात करायची असेल तर किंवा आपल्या छंदात काहीतरी नव्याने करावेसे वाटत असेल तर त्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. अ‍ॅसिडिटी, मायग्रेन सारखे त्रास असतील तर पथ्यपाणी नीट सांभाळावे. कोणत्याही वादविवादात शक्यतो पडू नका. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास शक्यतो टाळावेत.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष या सप्ताहात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. घरगुती प्रलंबीत कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना अचानक एखाद्या कामातून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. मात्र ज्यांना परदेशात शिकायला जायचं आहे किंवा परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंध आहे त्यांना खूप चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. नोकरदारांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नित्य म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. धनलाभ होतील. सप्ताहाचा मध्य कौटुंबीक सौख्याचा आहे. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. सप्ताह मध्यानंतर एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असणार्‍यांना हा काळ भरीव यश देणारा ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी कालावधी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. रविवारी वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धनलाभाचे योग आहेत. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम काम होईल. कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांकडून काही लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र आत्मसात कराल. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मित्रमंडळींच्या भेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी छान खरेदीचे योग येऊ शकतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
रविवारचा दिवस संमिश्र असेल. त्यानंतर मात्र संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. रविवारी काही खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींसाठी मात्र हा काळ चांगला आहे. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींमध्ये मनाचा कल असेल. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग येतील. हातून दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. नोकरी किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. आर्थिक लाभही काहींना होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या गणपतीच्या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)