अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune, astrologerinkothrud)

मेष रास
सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहे. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्‍यास हा कालावधी चांगला आहे. अचानक लाभ होतील. काहींना प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग शक्य. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. याउलट काहींना याच काळात अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुलांबाबत एखादी चांगली घटना शक्य आहे. विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात व नंतर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: या काळात ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. ह्रदयविकाराचा त्रास असणार्‍यांनी मात्र थोडी काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगल्या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीतील व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटनांची नांदी होईल. धनलाभ होतील. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्तस्वरुप देऊ शकाल. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात डोळे किंवा दात यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ संभवू शकतात. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ ध्यानधारणा (मेडिटेशन) यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. पायाच्या तळव्यांना जपावे. सप्ताहाच्या शेवटी काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. परदेशासंबंधीत कामांसाठी मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)