अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune, astrologerinkothrud)

मेष रास
सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवत रहातील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात समाधानकारक काम होऊ शकेल. वकील, आहारतज्ञ, केमिस्ट व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. नित्योपासनेत लक्ष लागणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी झगडावे लागेल. संततीशी वाद टाळावेत. ज्योतिषशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र सर्दी, दात किंवा घशासंबंधी काही तक्रारी या काळात जाणवू शकतील. थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. एखाद्या उत्सव/ समारंभात भाग घेण्याचे योग संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. मात्र यशासाठी झगडावे लागेल. अती आत्मविश्वास या काळात उपयोगाचा ठरणार नाही. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवतील. हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहाच्या सुरूवातीला दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात घरातील वातावरण उत्सव समारंभाचे रहाणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटनाही शक्य.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त प्रवास शक्य. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे. काहींना डोकेदुखी किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास या काळात जाणवू शकतो. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची ठरेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. कलाकारांसाठी हा काळ खूप चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. एखाद्या कामात चांगला लाभ संभवतो. सप्ताह अखेर लेखक/ खेळाडू यांना चांगली आहे. सहल किंवा प्रवासासाठी हा काळ चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. जुने मित्र किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य. संततीसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण सप्ताहात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. मस्त पार्टीचे योग येऊ शकतील. परदेशगमन करण्यास अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांना हा कालावधी विशेष आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होतील. उपासना करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात वरीष्ठ तुमच्यावर खूष असतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. भागीदारीत व्यवसाय ज्यांना सुरु करायचा आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस पुन्हा धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहाची सुरूवात संमिश्र असणार आहे. काही मनाविरुध्द घटना तर काही तुमच्या कष्टाला दाद देणार्‍या घटना संभवतात. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ/ सर्जन यांना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)