अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune, astrologerinkothrud)
मेष रास
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवास छान फ़ायदेशीर ठरतील. कार्यक्षेत्रात वरीष्ठांचे व सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खुप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. काहींना मात्र याच काळात अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यात मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या कामांमध्ये यश संभवते. सप्ताहाच्या शेवटी लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना चांगला काळ आहे. प्रवासाचे योग संभवतात. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील.
सप्ताह मध्य धनलाभाचा ठरु शकेल. मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
कौटुंबीक सौख्याचा हा काळ असणार आहे. सप्ताहाच्य शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुश असतील. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील. लेखक, कवी यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहाच्या सुरूवातीला चांगली खरेदी कराल. काही अनावश्यक खर्चही करावे लागू शकतील.
आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवू शकतात. काळजी घ्यावी. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. मात्र अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यात मनाला उगीचच कसलीतरी हुरहुर किंवा चिंता लागून राहील. आत्मविश्वासाची कमतरता जाणवत राहील. सप्ताह अखेरीस छान कालावधी आहे. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. डोळ्यांची काळजी या काळजी या काळात अवश्य घ्या.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. आर्थिक लाभ होतील. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा एखाद्या छंदासाठी वेळ द्याल. सप्ताहाचा मध्य छान खरेदीचा ठरु शकेल. परदेशासंबंधीत असलेल्या गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासनेत मन रमेल. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल.
सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. संततीसौख्य लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहाची सुरुवात अनुकूल असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्याचा हा काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य चांगला आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काहींना धनलाभाचे योग येऊ शकतात.
सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी छान खरेदी कराल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्यांना ग्रहमान फायदेशीर आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे. वस्तू गहाळ होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. मात्र या काळात धार्मिक कार्यातील सहभाग आनंद देणारा ठरु शकेल.
उपासना: श्रीराम किंवा विष्णू उपासना या काळात जरुर करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने तुमच्यावर वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना लाभदायक ग्रहमान आहे. लेखक, प्रकाशक यांना चांगल्या कामाबद्दल मान मिळण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. घरात छान वातावरण असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. नोकरी करणार्यांनी हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्याचा हा काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. शेअर्ससारख्या क्षेत्रात गुंतवणूक करायला मात्र हा काळ उचित नाही. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. नोकरीच्या शोधात असणार्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)