अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune, astrologerinkothrud)
मेष रास
सप्ताहाच्या सुरूवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. उधारी वसूल होईल. खरेदीसाठीही चांगले योग आहेत. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. आयात-निर्यात किंवा परदेशाशी ज्यांच्या व्यापाराचा संबंध आहे त्यांना या काळात चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. जोखीम असलेली कामे या काळात कटाक्षाने टाळावीत. वाहनेसुध्दा सावकाश चालवावीत. सप्ताहाची अखेर लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी मनाला आनंद देतील. धनलाभाचेही योग आहेत. ओळखीमुळे किंवा मित्राने केलेल्या मदतीने एखादे अडलेले काम मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या मध्यात जोडीदारासाठी छान खरेदी करु शकाल. मात्र या काळात दैनंदिन कामे रेंगाळतील. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. अती दगदग करणे व नकारात्मक विचार करणे टाळा. बेकायदा कोणत्याही गोष्टी करणे त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. काहींना आर्थिक लाभ होतील. हाच काळ ज्योतिषी, सर्जन, ऑडिटर यांना विशेष अनुकूल आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. धार्मिक कामांमध्ये रुची राहील. सप्ताह मध्य संमिश्र असेल. काही लाभ संभवतात. मात्र एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्याही काही समस्या या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. नित्योपासना करण्यास अनुकूलता जाणवेल. सप्ताह अखेर कौटुंबीक सौख्याची असेल.
उपासना: या काळात ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. काही धनलाभही या काळात होतील. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताह मध्यानंतर लेखक, कवी, साहित्यिक यांना चांगले ग्रहयोग आहेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या कामात केलेला हलगर्जीपणा नुकसानीचा ठरु शकतो. या काळात आपले काम बरे व आपण बरे हे धोरण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभही होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा असू शकतो. अॅसिडीटी किंवा पोटाचा त्रास या काळात होऊ शकतो. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. वाहने सावकाश चालवावीत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यायला हवी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र चांगला काळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनासुध्दा चांगला काळ आहे. सप्ताह अखेर विचित्र घटनांची असू शकेल. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम करु नका.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान चांगलं आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. लेखकांना, कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. अॅसिडिटी किंवा पोटाचा त्रास असेल तर पथ्यपाणी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवासयोग शक्य. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील चांगले वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना व खेळाडूंना यशासाठी जास्त मेहनत घ्यायला लागेल. परदेशात शिक्षणासाठी ज्यांना जायचे असेल त्यांना मात्र हा काळ काही संधी घेऊन येईल. संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर मजेत जाणार.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना धनलाभ होतील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. विद्यार्थ्यांना व खेळाडूंनाही अनुकूल कालावधी आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह अखेरीस तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. व्यावसायिकांना फायदा देणार्या काही नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. खरेदीसाठीही हा काळ चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
एकंदरीतच पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यार्या घटना संभवतात. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर वरीष्ठ खुश असतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह मध्यही तुम्हाला अनुकूल असणार आहे. लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवासाचे योग संभवतात. लेखक, कलाकार व ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर शेवटपर्यंत कायम राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)