अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासाठीही वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना प्रतिकूल ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. थंडी/ सर्दीचा त्रास होऊ शकतो. योग्य ती काळजी घ्यावी. नोकरी करणार्यांनी कामात हलगर्जीपणा करु नका. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीसुध्दा चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे त्रासदायक ठरू शकतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीला जपावे. आजारपण अंगावर काढू नका. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना मात्र अनुकूल काळ आहे. आपल्या हितशत्रूंवर या काळात नजर ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला नातेवाईक किंवा शेजारी यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. या काळात सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या मध्यानंतर ग्रहमानात सुधारणा होईल. विद्यार्थी, कलाकार तसेच प्रेमिकांना अनुकूल ग्रहमान आहे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
रविवारचा दिवस प्रिय घटनांचा असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यानंतर हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. संततिसौख्य लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
रविवारचा दिवस मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सोमवार ते गुरुवार कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. नविन वास्तू खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. प्रवासयोग फ़ायदेशीर ठरु शकतील. आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे मात्र बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस आत्मविश्वास वाढविणारे असतील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या बोलण्यामुळे आज लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम आवश्यक आहे. लेखकांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. नंतरच्या दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
रविवारचा दिवस छान असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात टाळाव्या. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जोखीम असलेली कामे करु नका.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी मात्र अनुकूल काळ आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. धनलाभ होईल. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. जोखीम असलेली कामे मात्र या काळात करु नका.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. नंतरचे दोन दिवस उत्तम असतील. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. वरीष्ठ खुष असतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस धनलाभ होतील. मित्रांच्या भेटी शक्य.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व वकिलांना चांगला काळ असेल. मात्र याच काळात आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसायिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. अचानक एखादी मानाची जबाबदारी अंगावर येऊन पडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)