अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. त्यानंतर सोमवार व मंगळवार हे दोन दिवस भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होऊ देऊ नका. प्रवासही या काळात शक्यतो टाळलेलेच बरे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेली सर्वच कामे टाळावीत. सर्जन, मानसोपचारतज्ञ, विमा व्यवसायिक यांना मात्र हा कालावधी अनुकूल ठरणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर शेवटपर्यंत कायम टिकणार आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
रविवारी मनासारखी खरेदी होईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नृत्यकलेशी संबंधितांना मात्र हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. आपले आरोग्य सांभाळा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे कोणी हितशत्रू असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्य शेवटी भावंडांशी वाद टाळा.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण आनंदी असेल. हातातली कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे तुमचा कल असेल. सप्ताह अखेरीस मनाला आनंद देणार्या घटना शक्य आहेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठ खूश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. लाभदायक योग आहेत. सप्ताहाचा मध्य कार्यपूर्तीचा ठरु शकेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील. सप्ताहाच्या शेवटी काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कौटुंबीक सौख्य लाभेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात भावंडांशी वाद टाळावेत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. काहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात उचित काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतात. जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. जुनी येणी वसूल होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनही चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाराकडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. धनलाभ होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कोणतेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे टाळा. अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
रविवारचा दिवस चांगला आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त मजेत वेळ जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना खूप अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थी, लेखक व कलाकारांनासुध्दा हा कालावधी खूप चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)