अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असू शकेल. खर्च वाढतील. मात्र काहींना चांगले अनुभव येतील. उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. पारमार्थिक उन्नतीसाठी चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसायिकांना लाभदायक संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे किंवा टिकेमुळे लोक नाराज होऊ शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. कुटुंबीय किंवा जिवलगांसमवेत वेळ मजेत घालवू शकेल. लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सर्जन, ज्योतिषी, विमासंबंधी काम करणारे व मानसोपचारतज्ञ यांनासुध्दा हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. रागावर नियंत्रण ठेवावे. हितशत्रूंवरही लक्ष ठेवावे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. जोखीम असलेली कामे या काळात अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. सप्ताह अखेरीस गूढ विषयांमध्ये मन रमेल. संशोधन कार्याशी संबंधीत असणार्‍या लोकांना नवीन काहीतरी गवसण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. धार्मिक गोष्टींसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. काहींना प्रमोशन/ पगारवाढ/ एखादी शाबासकीची थाप मिळू शकते. नविन विषय शिकायला सुरुवात करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे टाळा. खरेदीसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे तसेच ध्यानधारणा/ मेडीटेशन करणार्‍यांना काही चांगले अनुभव या काळत शक्य आहेत.
उपासना: गणपतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
रविवारची सकाळ सोडल्यास संपूर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मन प्रसन्न करणार्‍या घडतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूलता असेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कलाकारांना हा कालावधी चांगला आहे. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठीही काळ चांगला आहे. घरातील वातावरण प्रसन्न रहाणार आहे. सप्ताह अखेरीस एखाद्या मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
उपासना: श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा या काळात जरुर जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नाही. घरातील शांतता आपल्या वागण्या बोलण्याने भंगणार नाही याची काळजी घ्यावी. विमा प्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. लेखक/ ब्लॉगर्स/ कलाकार यांना अनुकूलता जाणवेल. काहींना प्रवासयोग संभवतात. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटी होतील. एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभाग घेता येईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वकिलांना व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना हा काळ चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनाही चांगले योग आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या सहवासात वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रतिकूल असेल. एखादी मनाविरुध्द घटना शक्य आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर विशेष काळजी घ्यावी. प्रॉपर्टीची कामे लांबण्याची शक्यता आहे. तर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ मस्त जाणार आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगले ग्रहमान आहे. घराच्या डागडुजीसाठी किंवा सजावटीसाठी काही खर्च कराल. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व लेखक यांना अनुकूल आहे. जुन्या मित्रांची भेट होईल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्तहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना काळ चांगला आहे. मात्र या काळात जास्त दगदग करु नका. आपली तब्येत सांभाळा.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. मित्रांच्या किंवा आवडत्या माणसांबरोबर वेळ छान जाईल. लेखक, ब्लॉगर यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांसाठीही लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगले ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. नवी उमेद निर्माण होईल. सप्ताह अखेरीस संततीशी वाद टाळावेत. प्रेमिकांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मात्र परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना काही लाभ शक्य आहेत.
उपासना: रामरक्षा किंवा विष्णूसहस्त्रनाम म्हणणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
पूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ होतील. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य आहेत. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची असेल. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमचा लोकांवर चांगला प्रभाव असेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात तुमच्या बोलण्यामुळे कोणीतरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. आपल्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताह अखेर अत्यंत अनुकूल असणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. लेखक, कलाकार, प्रकाशक यांना यशदायक काळ आहे. प्रवास लाभदायक ठरतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)