अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
रविवारी संध्याकाळपर्यंचा काळ प्रतिकूल आहे. आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. त्यानंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मंगळवार अखेरपर्यंत एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह मध्यात व नंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व कटकटीची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. जोडीदाराला जपा. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. कुलस्वामिनीचा जप करावा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ व विमा व्यावसायिक यांना हा कालावधी चांगला आहे. नवनवीन कल्पना सुचतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी असेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. आपल्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. विशेषत: आपल्या जोडीदाराला दुखावू नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी या काळात आपले सर्व व्यवहार पारदर्शी ठेवावेत. सप्ताह मध्यात व त्यानंतर अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवावे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
रविवार दुपारपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. मधूमेह असणार्‍यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी विनाकारण कोणाशी शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहने हळू चालवावीत. जोखीम असलेले काम सध्या तरी टाळलेलेच बरे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताह प्रतिकूल आहे. रविवारचा दिवस चांगला जाईल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रवासयोगही काहींना येऊ शकतात. त्यानंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात सध्या मोठी गुंतवणूक करु नका. कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्‍यांना मात्र चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत काहींना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
रविवारचा दिवस सोडल्यास ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. रविवारी वाहने जपून चालवा. सोशल मिडियावर काही शेअर करणार आसाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. नंतरचा पूर्ण आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
रविवारी अ‍ॅसिडिटी किंवा उष्णतेचे विकार जाणवू शकतील. त्यानंतरच्या दोन दिवसात एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. वरीष्ठांची अनुकूलता राहील. साहित्यिक, लेखक, कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात केलेल्या कामाचं चीज झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. कलाकार, वादक, कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल घटना शक्य आहेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. महत्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. सप्ताह मध्यात मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पुर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)