अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टम स्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगले आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही चिंता मनाला सतावत असतील. आपल्या मनावर व रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडे/ नातेवाईक यांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी, पोटाचे/उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांची असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. आपल्या रागावर या काळात नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरात छान खरेदी कराल. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या लेखनामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीयस्थानात केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. गृहसौख्य लाभेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थी, कलाकार यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद टाळा. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. लेखकांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात केतू, तृतीयस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी, गृहसजावटीसाठी वेळ काढाल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात. मात्र आपल्या बोलण्यामुळे या काळात कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा नको. आपली मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. मनासारखी खरेदी करु शकाल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, सर्जन यांना मात्र हा कालावधी चांगला जाणार आहे. सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा ठरु शकेल. प्रवासयोग येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आयात- निर्यात करणार्या व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. २ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राची अनुक्रमे सूर्याशी व मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रतिकूल असणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)