अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२१) 

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टम स्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धनलाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. इस्टेट एजंट, बिल्डर यांना ग्रहमान चांगले आहे. गृहसजावटीसाठी व घरासंबंधी काही गोष्टी प्रलंबित असतील तर त्यासाठी वेळ द्याल. सप्ताहाच्या अखेरीस कलाकार व विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दी करणारे ठरु शकतील. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान प्रतिकूल आहे. घरातील शांतता बिघडणार नाही याची काळ्जी घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवार खरेदीसाठी अनुकूल असेल. आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी छान खरेदी होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना फायदेशीर दिवस आहे. आरोग्याची मात्र काळजी या काळात घ्यायला हवी. त्यानंतरचे दोन दिवस कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांशी संपर्क होईल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे तसेच प्रवासाचे योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीची कामे व्व्यवस्थित पार पडतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
उपासना: कालभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभ होतील. व्यापार्‍यांना एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात चांगली खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीय स्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्येही छान काम होईल. केलेल्या कामाचं वरीष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहाच्या शेवटी उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ शक्य आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात शुक्र, केतू, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे किंवा वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ज्योतिष, मानसशास्त्र व ईन्शूरन्स हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहे. आयात-निर्यात करणार्‍या व्यापारांना लाभदायक काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने प्रसन्न असाल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीतील व्यवसायाला पूरक ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना घडतील तर काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. धार्मिक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून कामे करुन घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा फायदा करुन घ्या. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्‍यांसाठी फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच स्टेशनरी सप्लायर्स, छोटे विक्रेते यांना खूप अनुकूल असेल. जोडीदाराबरोबर हा काळ छान जाईल, सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रवास टाळावा.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी घरात छान वातावरण असेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. धनलाभाचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना, कष्टाला पर्याय नाही याची आठवण करुन देणारे असतील. ज्योतिषी, इतिहासकार व मानसोपचार तज्ञ यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. तब्येतीबाबत काही किरकोळ समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शनिशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे मंगळ व गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला शनिचा चंद्राशी प्रतियोग तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थी, खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. लग्न ठरविण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)