अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), अष्टम स्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगले आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायात फायदा होईल. नृत्यकलेशी संबंधितांनासुध्दा अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नका. या काळातील राग, चीडचीड ही दीर्घकाळासाठी नुकसानदायक ठरु शकेल. काहींना या कालावधीत मायग्रेन, डोकेदुखी, पित्तविकारांचा त्रास होऊ शकेल. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. आपल्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत घालवाल. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्य आपल्याला संमिश्र आहे. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मात्र याच काळात अचानक धनलाभाची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतील. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), षष्ठस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन निराशेने ग्रासणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. मानसोपचार तज्ञ, इतिहासकार तसेच विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सप्ताह मध्यात आपल्या कामात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले प्रतिस्पर्धी, हितशत्रू यांच्यावर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या अखेरीस काही अनपेक्षित लाभ होतील. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटी मनाला आनंद देऊ शकतील. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. आपली व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. भागीदारीसाठी काही प्रस्ताव या काळात आले तर ते कितीही आकर्षक दिसत असतील तरी लगेच मान्यता देऊ नका. तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा. सप्ताह मध्य व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंतचा काळ आपल्या कार्यक्षेत्रात यश देणारा ठरु शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. जोखीम असलेले कोणतेही काम या कालावधीत करू नका. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल. नवीन काही शिकायचे असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. आपल्या छंदांनाही या कालावधीत जरूर वेळ द्या. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध(व), तृतीय स्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जातील. प्रेमिकांसाठी हा काळ चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय असल्यास काही फायदेशीर व्यवहार होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर अपघातभय आहे. काळजी घ्यावी. जोखीम असलेले कोणतेही व्यवहार या काळात नकोत. उष्णतेच्या विकारांचा त्रास या काळात संभवतो. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, चतुर्थस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकण्यासाठीही चांगला दिवस आहे. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवारी व मंगळवारी तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय सप्ताह अखेरपर्यंत घेऊ नका. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, तृतीयस्थानी गुरु(व), शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुधव) अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या लोकांबरोबर वेळ छान व्यतीत कराल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. संततीच्या संदर्भात एखादी चांगली बातमी कळू शकेल. कलाकार व खेळाडूंना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र घटनांचा काळ आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. मात्र नोकरीच्या प्रयत्नात असलेल्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: काळभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल. धनलाभाचे योग आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना चांगला कालावधी आहे. आपल्या कार्याची प्रशंसा लोक करतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींकडॆ मनाचा कल राहिल. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), दशमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. मनाला एक प्रकारची विचित्र हुरहुर लागून राहील. डोळे किंवा दातांच्या समस्या या काळात जाणवतील. आपल्या बोलण्यावर या काळात नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या मध्यात प्रवास टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकार्यांचे विचित्र अनुभव या काळात येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात गुरु(व), शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु मार्गी होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल व मंगळ तूळ राशित प्रवेश करेल आणि २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार व मंगळवार लाभदायक घटनांचे ठरु शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्य चांगला आहे. काही धनलाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर डोळ्यांचे काही त्रास किंवा तोंड येणे असे उष्णतेचे त्रास संभवतात. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांच्यासाठी काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)