अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), अष्टम स्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत आणि तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. धार्मिक कृत्ये किंवा उपासना करण्याकडे मनाचा कल असेल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. कार्यक्षेत्रात तुमचा रुबाब वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असणार आहे. मुलांची प्रगती आनंदाला कारणीभूत ठरणार आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. एखाद्या समारंभात भाग घ्यायचा योग शक्य. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. जोखीम असलेले व्यवहार या काळात टाळावेत. मात्र काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. तुमचे कोणी गुरु असतील किंवा गॉड फादर असतील तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने एखादे काम पटकन होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), षष्ठस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची तक्रारी जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे विकार असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्यांना मात्र काही चांगल्या संधी चालून येतील. वैद्यकीय व्यावसायिकांना हा काळ जास्त चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम असलेले व्यवहार टाळा. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी आपली धार्मिक मध्ये दुसऱ्यांवर लादू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काही लाभ होतील. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना उत्तम कालावधी आहे. धनलाभाचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. फार्मासिस्ट व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आवडत्या मंडळींबरोबर वेळ छान घालवता येईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद नको. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर दुर्लक्ष करु नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मौजमजा करण्यात तसेच आराम करण्यात घालवाल. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप किंवा कौतुकाचे शब्द उत्साह वाढवतील. सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील विशेषतः वाताचे विकार व हाडाचे संबंधी काही दुखणे असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद घालू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध(व), तृतीय स्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कर्तुत्वाला वाव देणारा काळ आहे. प्रवासयोग शक्य. हातून चांगले लेखन होईल. साहित्यिक, लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गृहसजावट किंवा घराच्या दुरुस्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरात प्रसन्न वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या शेवटी नशिबाची साथ चांगली लाभणार आहे. कमी श्रमात जास्त लाभ होतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, चतुर्थस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धनलाभ होतील. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास सुखकर होतील. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांच्याकडून चांगले लिखाण होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरात एखादा समारंभ किंवा पार्टीचे जरुर आयोजन करावे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, तृतीयस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुधव) अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात काही लाभ घेऊन येणारे ठरु शकेल. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. मन आनंदी असेल. भावंडांच्या भेटीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम काळ असणार आहे. आयात-निर्यात करणार्या व्यपार्यांना हा कालावधी विशेष चांगला असेल. सप्ताहाच्या मध्यात काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. भाग्यवर्धन करणार्या गोष्टी शक्य आहेत. काही लाभ होऊ शकतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी आनंद देतील. प्रॉपर्टीच्या कामांमधूनही लाभ होऊ शकतील. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. मात्र पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभही होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), दशमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ एकदम छान असणार आहे. लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. त्यानंतरचे २ दिवस मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर मजेत घालवाल. काही लाभ होतील. खरेदीसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी मनाला काहीतरी चिंता लागून राहील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, मंगळ, बुध व शनि यांच्याशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि शनि मार्गी होईल. १३ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)