अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ ऑक्टोबर  ते ९ ऑक्टोबर २०२१) 

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), अष्टम स्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, कलाकारांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा शेजार्‍यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मात्र प्रवासात काळजी घावी. तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना शक्य. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभ होतील. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, आहारतज्ञ, यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), षष्ठस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. लेखक, कवी व कलाकारांना हा काळ खुप चांगला आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. सायनस, मायग्रेन याचा त्रास असणार्‍यांनी काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणूक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच एम. आर. यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. आपल्या संभाषण कौशल्यामुळे कामे होतील. सप्ताह मध्यात भावंडांशी किंवा शेजार्‍यांशी वाद संभवतात. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांना प्रतिकूल कालावधी आहे. वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची असेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्याने वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. कलाकारांना काळ छान आहे. सप्ताह मध्यात काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. आर्थिक गोष्टींसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. काही आर्थिक लाभ होता होता राहून जातील किंवा पैशांसंबंधी काही वाद/ कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. डोळे/ दातांच्या समस्या जाणवू शकतील. सप्ताह अखेर पुन्हा ग्रहमान अनुकूल होत आहे. लेखक, कवी व कलाकारंना खुप चांगला काळ आहे. मन आनंदी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध(व), तृतीय स्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. प्रवासासाठी व परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात काही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. वरीष्ठांशी व सहकार्‍यांशी वाद टाळा. घरातील वडीलधारी व्यक्तींची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. घरात छान वातावरण असेल. कलाकारांना विशेषत: गायकांना चांगला काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, चतुर्थस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- हा सप्ताह आपल्याला फ़ारसा चांगला नाही. काही आर्थिक लाभ होता होता रहाणार आहेत. मित्र-मैत्रिणी किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. काही खर्च अचानक उद्भवू शकतील. कोणाशीहि वाद होणार नाही याची दक्षता घ्या. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. व्यसनांपासून लांब रहा. बेहिशोबी/ गैरमार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास या काळात अंगाशी येऊ शकेल. ज्यांना ज्योतिष, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांची आवड आहे किंवा जे अशा विषयांचा अभ्यास करत असतील त्यांना मात्र अतिशय चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, तृतीयस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुधव) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काही आर्थिक लाभ होता होता राहून जातील किंवा पैशांसंबंधी काही वाद/ कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाराज होऊ नका. मित्रांबरोबर वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. ज्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य. वैद्यकिय व्यावसायिक, आहारतज्ञ, जीम ट्रेनर यांना काळ अनुकूल आहे. नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात नोकरीतील किंवा व्यवसायातील लोकांनी आपल्या कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. वरीष्ठांशी व सहकार्‍यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या जोडीदाराशीही काही वाद असतील तर या काळात ते वाढणार नाहीत याकडेही लक्ष द्या. सप्ताहाच्या शेवटी काही अनुकूल घटना शक्य.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व) आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र ग्रहमानाची आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. ज्योतिषशास्त्रासारखे विषय शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही विचित्र घटना शक्य आहेत. शत्रूंचा त्रास संभवतो. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठ खुश असतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), दशमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. संततीशी व जोडीदाराशी वाद टाळावेत. विद्यार्थ्यांना प्रतिकूल कालावधी आहे. ह्रदयासंबंधी काही त्रास किंवा आजार असतील तर या काळात काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राची अनुक्रमे सुर्य, मंगळ व बुधाशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ८ तारखेला सूर्याची मंगळाशी युती होईल. ९ तारखेला सूर्याची बुधाशी, चंद्राची शुक्राशी व बुधाची मंगळाची युती होईल आणि चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात घरातील वातावरण बिघडणार नाही याची खवरदारी घ्या. विशेषत: जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेर संमिश्र घटनांचा ठरेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मात्र जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)