अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा कालावधी सोडला तर सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सोमवार, मंगळवार कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना पती/ पत्नीच्या संदर्भातील शुभ वार्ता समजतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्यांना अतिशय चांगला कालावधी आहे. नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यात गायक, आहारतज्ञ, थेरपिस्ट यांना अनुकूल ग्रहमान आहे. आरोग्याच्या मात्र काही समस्या जाणवू शकतात. सर्दी किंवा कफ़विकाराचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यानंतर कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, इस्टेट ब्रोकर्स यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार विचित्र घटनांचा ठरु शकेल. अचानक एखादा खर्च समोर उभा ठाकू शकेल. नंतरचे दोन दिवस खरेदीसाठी अनुकुल असतील. कुटुंबीयांसह छान खरेदीला जायला हरकत नाही. हा काळ पारमार्थिक उन्नती करणाऱ्यांसाठी उत्तम असणार आहे. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळणार आहे. थोडा वेळ स्वत:साठीही जरुर काढा. घरातील बिलंवित कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, ब्लॉगर्स, कवी व गायक यांना चांगला काळ आहे. प्रवासाचेही योग संभवितात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. काही धनलाभ होतील. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीयस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर वेळ मजेत जाईल. मित्राच्या मदतीने एखादे काम मार्गी लागू शकेल. लेखकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर काही अपेक्षित असलेले लाभ विनाकारण लांबण्याची शक्यता आहे. बेकायदा गोष्टी या काळात टाळा. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. परदेशगमन करायचे असल्यास अनुकूल कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात बुध, शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईन्शुरन्सचे काम करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराची काळजी घ्या. जोडीदाराला काही शारीरीक त्रास असतील तर दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा असू शकतो. विमा व्यावसायिकांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताह मध्यानंतर काही लाभ होऊ शकतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्यांसाठी फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ दशमस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना यशदायक काळ आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील. व्यावसायिकांचे निर्णय बरोबर ठरतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. शनिवारच्या दिवशी वाहने जपून चालवावी. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेली बरी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. त्यानंतरचे दोन दिवस चांगले आहेत. घरात प्रसन्नता असेल. काहींना गुरुकृपेचा लाभ होईल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. कलाकारांच्या कामाचे कौतुक होईल. प्रेमिकांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांनाही पुरेसी काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल आणि बुध वक्री होईल. २९ तारखेला मंगळाशी चंद्राचा केंद्रयोग होईल. १ तारखेला रवि-चंद्र व चंद्र-मंगळ लाभयोग तर चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला बुध(व) कन्या राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल याचबरोबर चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग, शुक्राबरोबर त्रिकोणयोग व शुक्राबरोबर केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले चार दिवस संमिश्र असणार आहेत. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. सोशल मिडीयावर काही पोस्ट करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात मनात काही चिंता लागून रहाण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी प्रतिकूल काळ आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात सध्या गुंतवणूक करू नका. सप्ताहाच्या मध्यानंतर ग्रहमानात सुधारणा होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)