अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये मन रमेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना व नृत्यकलेशी संबंधित असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही सुसंधी चालून येण्याची शक्यता आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा व्यवहारापासून लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. सप्ताहाच्या अखेरीस जोखीम टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले चार दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा पुरेसा मोबदला मिळणं कठीण आहे. मात्र काळजी करू नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान आपल्याला पुन्हा अनुकूल होत आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा असू शकेल. वरीष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, तृतीयस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह आरोग्याची काळजी घ्यायची आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. छान लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, धनस्थानात शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर विम्यासंबंधी कामे करणार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र या काळात अपघातभय असल्याने वाहने हळू चालवावीत. वाहनांची देखभाल व्यवस्थित ठेवावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. नोकरदार लोकांसाठी चांगला कालावधी आहे मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदारासाठीही काही खर्च करावे लागतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार चोख ठेवावेत. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य लेखक, सहित्यिक व विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. भवंडाबाबत चांगली बातमी कळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. गुंतवणूकीसाठीही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र लाभदायक कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर कमी श्रमात जास्त यश देणारा काळ आहे. मुलांबद्दल चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही लाभ होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण असेल. लेखक, वक्ते व कवी चांगले काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताह मध्यात छान लाभ होतील. भावंडांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर एखादी सहल किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रेमिकांना ग्रहमान छान आहे.
उपासना: उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे सोमवार दुपारपर्यंत छान खरेदी होईल किंवा अचानक काही खर्च करावे लागतील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस काहींना धनलाभाचे असतील. मन आनंदी असेल. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आपल्याला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव सप्ताह मध्यात येणार आहे. तुमचे वरीष्ठ व सहकारी तुमच्यावर खुश असतील. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दी करणारे योग आहेत.
उपासना: उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु(व), शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध तूळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांच्या भेटी होतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचेही योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक काळ आहे. खेळाडू, कलाकार व विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)