अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रतिकूल कालावधी आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने हळू चालवावीत. विमा प्रतिनिधी, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. धनलाभ होतील. नित्यउपासना व्यवस्थित पार पडतील. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रात अनुकूल बदल शक्य. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत व्यतीत कराल. जोडीदाराकडून काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. भागीदारीतल्या व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. संततीसौख्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा ठरु शकेल. या काळात वाहने जपून चालवा. जोखीम असलेली कामे टाळा. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास प्राप्त होऊ शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही आरोग्याच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र लाभदायक ग्रहमान आहे. आहारतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवासाचे बेत मनात घोळतील. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करू नका. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानात मंगळ, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारामधून चांगला फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही मोठी जोखीम घ्यायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमिकांनाही हा कालावधी चांगला आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, बुध, तृतीयस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हातातली कामे लवकर संपवून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खूप चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळण्यासाठी शक्यता आहे. मुलांबाबत चांगली बातमी कळेल. विवाह ठरविण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. वकील किंवा कायदेविषयक कामे करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, धनस्थानात शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुश असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टीची कामे सध्या पुढे ढकललेलीच बरी. सप्ताहाच्या शेवटी संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू यांनाही चांगले ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडिटी, पोटाच्या किंवा डोळ्यांसंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची चांगली मदत मिळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात मंगळ, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही लाभदायक घटना संभवतात. आवडत्या लोकांच्या भेटी शक्य. नवनवीन विषयांच्या अभ्यासाची आवड निर्माण होईल. थोडा वेळ आपल्या छंदांसाठी जरूर द्यावा. सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. काहींना धनलाभ होईल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. मात्र या काळात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. ज्यांचा व्यवसाय फ़िरस्तीचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात मंगळ, बुध, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान चांगले असणार आहे. घर किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींच्या खरेदीसाठी अनुकूल कालावधी आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहा. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात मंगळ, बुध, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटीचे योग येतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास मिळेल. कार्यक्षेत्रात वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. नृत्यकलेशी संबंधितांना अविस्मरणीय अनुभव या काळात शक्य आहेत. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांनासुध्दा चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काही लाभ होऊ शकतात.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. काहींना मात्र अचानक बदली किंवा नोकरीच धोक्यात येण्यासारख्या प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकेल. व्यावसायिक लोकांना एखादा लाभ होता-होता राहून जाऊ शकेल. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर किंवा आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखाल. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे. परदेशासंबंधीत व्यावसायिकांसाठीही चांगला कालावधी आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग तर बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा चंद्राशी केंद्रयोग होईल. १७ तारखेला चंद्राची शनिशी युती व शुक्राशी केंद्रयोग तर शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना तसेच व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)