अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात बुध, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी रात्रीपर्यंतचा काळ आनंदाचा असणार आहे. मौजमजा करण्याकडे कल असेल. त्यानंतरचे दोन दिवस समिश्र असणार आहेत. वडीलधारी मंडळींचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना मात्र यशाकरता झगडावे लागेल. सप्ताह मध्य वकील, फार्मासिस्ट व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यांच्यासाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काही नवीन संधी चालून येऊ शकतील. आरोग्य चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. वैवाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संवाद साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायिकांना चांगले लाभ होऊ शकतील. काहीना प्रवास योग्य शक्य आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठी चांगला आहे. काहींना बक्षीस, प्रशंसा किंवा मानसन्मान मिळेल. प्रेमिकांना लग्न करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदारांसाठी चांगला असेल. शत्रुनाश होईल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढती किंवा चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीयस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- अतिशय छान सप्ताह आहे. रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ घरगुती गोष्टींसाठी अनुकूल आहे. घरासंबंधी काही कामे प्रलंबीत असतील तर ती आता उरकून घेऊ शकतात. काही भाग्यवर्धक घटनाही घडू शकतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी लेखक व साहित्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारची सकाळ एकदम मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवारपर्यंत खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात असाल तर आपल्या चीजवस्तू सांभाळा. भावंडांची भेट शक्य आहे. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. लेखक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी यशदायक काळ आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ आणि लाभस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व परदेशाशी ज्यांचा कामाचा संबंध असतो त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. संपूर्ण सप्ताह खरेदीसाठी अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही प्रतिकूल प्रसंग घडतील. विमा व्यावसायिकांना मात्र चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणाच्यातरी मृत्यूमुळे रिकामी झालेली जागा किंवा पैसे मिळणे अशा विचित्र घटनांमधून लाभ शक्य आहेत. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. प्रॉपर्टीच्या बाबतीतही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट उत्त्म असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खूष असतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ६ तारखेला सूर्य व चंद्र यांची युती होईल, शुक्र व गुरुचा त्रिकोण होईल आणि शुक्र तूळ राशित तर मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. ७ तारखेला मंगळ व चंद्र यांची युती होईल. ९ तारखेला बुध व चंद्र यांची युती आणि चंद्र व गुरुचा त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल आणि प्लूटो कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारची सकाळ छान असेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. नंतर मंगळवारपर्यंतचा काळ नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगला आहे. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होतील. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराकडून काही लाभ होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group