अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, बुध, षष्ठस्थानात शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवार रात्रीपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे बेत ठरतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानात मंगळ, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. शक्य तो नव्याने कोणतीही गुंतवणूक या सप्ताहात तरी करु नका. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. वाहने जपून चालवावीत.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, बुध, तृतीयस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवससुध्दा चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असणार्यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला असणार आहे. रविवारी घरातील वातावरण छान राहील. काहींना धनलाभ शक्य. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा काळ अडचणींचा ठरु शकेल. आरोग्यासंबंधी काही तक्रारी संभवतील. अती आत्मविश्वास या काळात घातक ठरु शकेल. नोकरी करणार्यांनी आपल्या वरीष्ठांशी वाद टाळावेत. खेळाडूंनी किंवा व्यायाम करणार्या लोकांनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घराच्या दुरुस्तीसाठी काही खर्च या काळात करावे लागू शकतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार सध्या करु नका. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात मंगळ, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. विशेषत: अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी संपर्क मनाला आनंद देईल. कलाकारांना हा काळ चांगला असेल. काही मान-सन्मान या काळात मिळू शकतील. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. घरातील लोकांशी विशेषत: आईशी वाद टाळावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात मंगळ, बुध आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रासाठी चांगले असतील. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडू शकतील. व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. काहींना धनलाभ होतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवास टाळावेत. भावंडांशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात मंगळ, बुध, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदी होईल. काही अचानक खर्चही करावे लागतील. बेकायदा असलेली कोणतीही गोष्ट या काळात करु नका. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, बुध, भाग्यस्थानात शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्यांना उपासनेत खंड पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, बुध, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. सप्ताह मध्यात व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. नोकरी करणार्यांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींची भेट या काळात मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी काही अचानक खर्च करावे लागू शकतील. जोखीम असलेली कामे टाळावीत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, बुध, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व मंगळाशी केद्रयोग तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग तर बुधाची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वरीष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. नित्य उपासनेत लक्ष्य लागणार नाही. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. सप्ताह मध्यात व्यवसायिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये. खर्च वाढतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जुने मित्र भेटतील. धनलाभ होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)