अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, तृतीयस्थानात बुध, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील. धनलाभ होईल. सप्ताह मध्यात मस्त खरेदी कराल. पारमार्थिक उन्नतीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी संततीबाबत चांगली घटना शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. धनलाभ होतील. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहमध्य कार्यपूर्तीचा असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होऊ शकेल. प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे इष्ट राहील. वाहने जपून चालवा. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना हा कालावधी विशेष चांगला असेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र आपल्या आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. जोडीदाराची तब्येत सांभाळावी तसेच जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. जोडीदाराला गृहित धरु नका. सप्ताह मध्य सुध्दा संमिश्र घटनांचाच असेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. मात्र स्वत:च्या तब्येतीला जपावे असे ग्रहमान सांगत आहे. विशेषत: मधूमेह किंवा यकृताची काही दुखणी असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामांसाठी प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: महादेवाची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात राहू, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या व जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवू शकतील. पाय/ पाठ/ गॅसेस/ संधीवाताचा त्रास असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात ज्योतिषी/ इतिहासकार/ सर्जन/ मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना काळ चांगला आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय यश मिळणार नाही. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग संभवतात. वाहने जपून चालवा. शक्य असल्यास काही दिवसांसाठी प्रवास पुढे ढकला.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत दिवस चांगला जाणार आहे. त्यानंतरचे २ दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा काळ नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकूल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. नोकरीत कामगारवर्गाचे सहाय्य मिळणार नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान प्रतिकूल आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. वाहने जपून चालवावीत. बेकायदा व्यवहार टाळा. विम्यासंबंधी काम करणार्यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत घरात छान वातावरण असेल. नंतरचे २ दिवस विद्यार्थ्यांना, कलाकारांना व खेळाडूंना चांगले आहेत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी आणि भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचा उत्कर्ष संभवतो किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- आठवडा छान असणार आहे. आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. लेखक/ ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील मात्र प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. आपल्या छंदालाही जरुर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. डोकेदुखी, मायग्रेन/ अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही व्याधी असतील तर काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग आहेत. लेखक, कवी, साहित्यिक यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. एखाद्या समारंभात भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या/ घरातील वस्तुंच्या सुशोभिकरणासाठी/ दुरुस्तीसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे. काहींवर गुरुकृपा शक्य.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना धनलाभाची शक्यता आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहायला मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांचा/ शेजार्यांचा छान अनुभव येईल. लेखक, प्रकाशक, साहित्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीचे व्यवहार करु नका. घरात वाद होणार नाही याची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. गूढ गोष्टींकडे तुमचा कल रहाणार आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी चांगला काळ आहे. एखादा अनावश्यक खर्चही करावा लागु शकतो. कुठल्यातरी गोष्टींची हुरहुर किंवा चिंता विनाकारण वाटत राहील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधित व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य लाभदायक असेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मौज मजा करण्याकडे कल असेल. जुने मित्र भेटतील. ऒळखीमुळे काही अडकलेली कामे सहजगत्या होतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला बुधाचा प्लुटोशी तर चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी प्रतियोग होईल तसेच चंद्र व गुरु यांची युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व प्लूटोशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ छान आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकतील. काही लाभही होऊ शकतात. त्यानंतरचे ३/४ दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. नित्योपासना व्यवस्थित पार पडतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही लोकांना उष्णतेमुळे होणारे तोंड येणे, डोकेदुखी अशाप्रकारच्या समस्या जाणवतील.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)