अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ जून ते ३ जुलै २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात बुध, राहू, तृतीयस्थानात सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. मात्र असे असले तरी वरीष्ठ तुमच्या चुका शोधण्याचाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर सध्या काही दिवस थांबावे. सप्ताहाच्या मध्यात काही चांगल्या घटना घडतील. धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटी शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग आहेत. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. घरातील वडीलधारी मंडळींचं सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. धातूसंबंधी व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. मित्राच्या मदतीने एखादे काम मार्गी लागू शकेल. शनिवारी प्रवास करणार असाल तर प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात त्रासाची व कंटाळवाणी असण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. निराशावादी विचार मनात येतील. पण काळजी करु नका ही ग्रहस्थिती तात्पुरती आहे. सप्ताह मध्यात नित्योपासना किंवा धार्मिक गोष्टींमधून मनाला शांतता मिळेल. सप्ताह मध्यानंतर काही लाभदायक घटना घडतील. मित्रांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी पैशांची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात बुध, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला पती/ पत्नीबरोबर वाद टाळावे. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे टाळावी. ज्योतिषशास्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करत असलेल्यांची या काळात चांगली प्रगती होईल. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठ दुखावले जातील असे वर्तन टाळावे. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास आवश्यक असतील तरच करावेत. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात बुध, राहू, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सध्या नकोत. कोर्ट-कचेरीचे काही व्यवहार प्रलंबीत असतील तर शक्यतो चार महिन्यानंतरचीच तारीख घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात बुध, राहू, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांनी यशासाठी शॉर्टकट टाळावेत. कलाकारांना प्रतिकूल काळ आहे. सप्ताह मध्य ज्यांना नोकरी बदलायची आहे अशा लोकांसाठी चांगला आहे मात्र नवीन संधी हातात आल्याशिवाय हातातील नोकरी सोडण्याची घाई करु नका. तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. बांधकाम व्यावसायिक तसेच वकील यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात बुध, राहू, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात थोडी प्रतिकूल आहे. वाद-विवाद टाळावेत. घरातील शांतता बिघडेल असे विषय सध्या टाळलेले बरे. ज्यांना श्वसवाचा/ दम्याचा त्रास आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घेतलेली बरी. घरासंबंधी काही दुरुस्ती/ आवराआवरी बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. आहारतज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना चांगला काळ आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात बुध, राहू, अष्टमस्थानात सूर्य आणि भाग्यस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला शेजार्‍यांशी किंवा भावंडांशी वाद होऊ शकतात. काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. लेखक व ब्लॉगर्स यांच्यासाठी प्रतिकूल काळ आहे. लेखन वादग्रस्त होणार याची काळजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात चांगले वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे, मात्र अती आत्मविश्वास किंवा गाफील रहाणे नुकसानीचे ठरु शकेल.
उपासना: मारुतीची स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात बुध, राहू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- हा पूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाची सुरूवात चागल्या घटनांची असेल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्ती भेटतील. काही छान लाभ होतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रवासाचे योग येतील. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर कामे चांगली झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना प्रतिकूल काळ आहे. अती आत्मविश्वास टाळावा.
उपासना: गजानन महाराज/ स्वामी समर्थ यांची पोथी वाचणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात बुध, राहू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच एखादा धनलाभ शक्य आहे. मात्र या काळात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. डोळ्यांची काळजी या काळात घ्यायची आहे. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर तुमच्यातील कलागुणांना छान वाव मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात बुध, राहू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकूल असेल. एखादा अचानक किंवा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक काही काळज्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र २/३ दिवसात परिस्थिती बदलणार आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. एखादा धनलाभ होऊ शकेल. मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी बुध, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण व  शनिशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. धनलाभाची शक्यता आहे. मित्र भेटतील. सप्ताह मध्यात ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे अशा लोकांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)