अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० जून ते २६ जून २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात बुध(व), राहू, तृतीयस्थानात सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच न्यायाधीश यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध(व), राहू, धनस्थानात सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्यात अडथळे येऊ शकतत. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना व वकीलांना हा काळ संमिश्र आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी हा काळ फ़ारसा अनुकूल नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला चांगले ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल.  भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यात प्रगती संभवते. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. मात्र ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. एखादा अचानक धनलाभही शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात बुध(व), राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वाद टाळा. अती दगदग टाळावी. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात बुध(व), राहू आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे मात्र कागदपत्रांची तपासणी तज्ञ व्यक्तीकडून केल्याशिवाय व्यवहार नकोत. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व प्रेमिकांसाठी अनुकूल आहे. उपासना, ध्यानधारणा मनाप्रमाणे होईल. काही अध्यात्मिक अनुभव शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील तसेच फ़िजिकल फ़िटनेससंबंधी काम करणारे लोक यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात बुध(व), राहू, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी, प्रकाशक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही प्रतिकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात बुध(व), राहू, दशमस्थानात सूर्य, शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लेखक, खेळाडू यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात बुध(व), राहू, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. प्रवास करणार असाल तर आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात बुध(व), राहू, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. एखादा अनपेक्षित खर्चही करावा लागू शकेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना काही नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ऊपासना करणार्‍यांना विशेष अनुकूलता आहे. उगीचच कुठल्यातरी गोष्टींची चिंता वाटत राहील. डोकेदुखी/ मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी. आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात बुध(व), राहू, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात मंगळ आणि  व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाचा शेवट मनाला आनंद देणार्‍या घटनांचा ठरु शकेल. प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात बुध(व), राहू, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मात्र आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात बुध(व), राहू, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरी करणार्‍यांनी आपल्या सहकार्‍यांशी व वरीष्ठांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी बुध(व), राहू, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल, गुरु वक्री होईल व शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. २३ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण तसेच चंद्राचा शनिशी लाभयोग व बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल आणि २६ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी तसेच विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. काहींना सुचक स्वप्ने पडू शकतात. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभही होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)