अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ जून ते १२ जून २०२१) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

(१० तारखेला होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचे वेधादि नियम पाळू नयेत. मात्र ते कोणत्या राशीसाठी काय फ़ळे देईल याबाबत २/३ दिवसात लिहिणार आहे).

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात सूर्य, बुध(व), राहू, तृतीयस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असणार्‍यांना या कालावधीत थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्य व त्यानंतर ग्रहमान छान आहे. धनलाभाची शक्यता आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. ब्लॉगर्स, लेखक व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. गायकांना काही नवीन संधी मिळू शकतील. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: श्रीसुक्ताचे पठण किंवा श्रवण या काळात भाग्याची वृध्दी करु शकेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), राहू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला बेकायदा व्यवहार करु नका. वाहने जपून चालवा. अचानक उदभवलेल्या खर्चाने त्रस्त होऊ शकाल. धर्मिक विचार मनात घोळत राहतील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या एखाद्या छंदासाठी किंवा आपल्या मुलांसाठी जरुर वेळ काढावा.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. मित्र मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध(व), राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगली आहे. ज्यांचा कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नविन संधी मिळण्याची शक्यता आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. प्रवास शक्यतो या काळात टाळलेलेच बरे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभाची शक्यता आहे. संगणक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. खाद्यपदार्थांशी संबंधीत भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असल्यास हा काळ उत्तम आहे. आपल्या  जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. विम्यासंबंधीत काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. मात्र हा काळ शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराला मदतीची गरज भासू शकते. जोडीदाराला पुरेसा वेळ द्यावा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी पारदर्शक व्यवहार ठेवावेत. छोटीशी गोष्ट्सुध्दा गैरसमजाला जन्म देऊ शकते हे लक्षात ठेवावे. सप्ताहाचा शेवट विमा व्यावसायिकांना चांगला व्यवसाय देऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात मंगळ आणि  व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. संततीशी वाद होण्याची शक्यता आहे. तर काहींना एखादा धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र काळ अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांना काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराच्या तब्येतीला जपावे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. सप्ताह मध्यात काही लाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तितकासा चांगला कालावधी नाही. कलाकार व खेळाडूंनाही मात्र चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. वैद्यकिय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांशी वाद टाळावा. आरोग्याचीही काळजी या कालावधीत घेणे आवश्यक आहे. या काळात सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात व त्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. एखादं बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द या काळात अचानकपणे आपल्याला सुखावून जातील. गुंतवणुकीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी व बुधाशी युती होईल. ११ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)