अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ मे ते २९ मे २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवार लेखक, कलाकार, साहित्यिक यांना चांगला असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाणार आहेत. काहींना छान धनलाभ होईल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटत राहील. ज्यांना ध्यानधरणा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. मात्र या काळात जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी एखादी गोष्ट मनाला आनंद देईल. आपला छंद किंवा आवडीचे एखादे पुस्तक वाचनात वेळ चांगला जाईल. नंतरचे दोन दिवस वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ यांच्यासाठी चांगले आहेत. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. हितशत्रूंवर नजर ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, सर्जन यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही खरेदी किंवा दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतील. घरातील शांतता बिघडणार नाही यासाठी प्रयत्न करावा लागेल. वादविवाद टाळावेत. परदेशात ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचे आहे किंवा त्याबाबत काही माहिती मिळवायची असेल तर हा कालावधी चांगला आहे. शेअर्ससारख्या व्यवहारांपासून मात्र सध्या लांबच रहावे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: रोज ३ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी/ नातेवाईकांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री ज्यांना करायची असेल त्यांना काही संधी  दृष्टीक्षेपात आल्यासारखे वाटेल. व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासात चालढकल करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना मात्र हा संपूर्ण सप्ताहच अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, साहित्यिक, कवी यांना हा काळ विशेष चांगला आहे. चांगले लेखन होईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर घरातील प्रलंबित कामे करावी लागतील. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. भावंडांशी/ नातलगांशी संपर्क मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. प्रवास करणार असाल तर प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. कुणाशीही वाद होणार नाहीत म्हणून जपा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस एकप्रकारची चिंता किंवा हुरहुर मनाला लागून राहिल. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र काळ उत्तम आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. गूढ गोष्टींकडॆ मनाचा कल राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस लेखकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीस्तोत्र नित्य म्हणावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतित कराल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम असलेल्या कामांपासून शक्यतो लांबच रहा. वाहने जपून चालवावीत.  सप्ताहाच्या शेवटी घरासाठी वेळ काढावा लागेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभाचे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरदार व्यक्तींबाबत आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचं आपल्याला चांगलं सहकार्य लाभणार आहे. आरोग्यासंबंधी मात्र काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. काही अडकलेली कामे अचानकपणे होऊन जातील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. विद्यार्थी, लेखक, कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्यातील आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. वरीष्ठ खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी जुन्या मित्रांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. काही लाभदायक घटना घडतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल आणि शनि वक्री होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २६ तारखेला बुध मिथुन राशित प्रवेश करेल आणि सूर्य चंद्राशी प्रतियोग व चंद्र शुक्राशी लाभयोग करेल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र व बुधाशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि चंद्राची प्लूटोशी व बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने जपून चालवावीत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट खर्चाचा ठरु शकेल. आयात-निर्यातीशी संबंधीत असणार्‍यांना मात्र हा कालवधी चांगला आहे.
उपासना: पांडुरंगाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)