अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ मे ते २२ मे २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवरी संमिश्र ग्रहमान आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मात्र या काळात भावंडांशी वाद टाळावेत. वादग्रस्त लिखाण टाळावे. त्यानंतरचे दोन दिवस घरातील वातावरण छान असेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबीत असल्यास त्या कामास प्राधान्य द्यावे. सप्ताहाच्या मध्यात आणि नंतर विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. कोणीतरी केलेले कौतुक तुमचा उत्साह वाढविण्यास मदत करणार आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटूंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्याल. एखादा पदार्थ स्वत: तयार करुन बघा नक्कीच आनंद मिळेल. आप्तेष्टांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. सप्ताह मध्यात छान लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना विशेष चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या अखेरीस विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल काळ आहे. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान वातावरण असेल. काही धनलाभ लांबले असतील तर ते आता मिळण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. मात्र प्रवास शक्यतो टाळलेले बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर प्रवासात काळजी घेणं गरजेचे आहे. लेखकांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ शकतात. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या अखेरीस गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात खरेदीने होऊ शकेल. एखादा अचानक उद्भवलेला खर्च करावा लागेल. पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा संपूर्ण काळ छान आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. मित्रांशी संपर्क साधाल. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या/ प्रियजनांच्या भेटीचे योग किंवा त्यांच्याशी बोलणे होईल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर ज्योतिष किंवा त्यासारख्या विषयांमधे रुची निर्माण होऊ शकेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहात छान ग्रहमान आहे. सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. काहींना नवीन संधीची चाहुल लागेल. सप्ताह मध्यात एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. आवडत्या लोकांशी संपर्क होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे किंवा जे आयात-निर्यातीचा व्यवसाय करतात त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर संपर्क होईल. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ गोष्टींकडे मनाचा कल असेल.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष या सप्ताहात नित्य म्हणावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद होऊ देऊ नका. नंतर मात्र पुर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठी कालावधी चागला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने प्रसन्न असाल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतीत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराशी वाद टाळावा. मातुल घराण्यातील नातेवाईकांशी संपर्क होईल. त्यानंतरचे दोन दिवस गूढ गोष्टींकडे मनाचा कल असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी हे दिवस महत्वाचे ठरु शकतील. सप्ताह मध्य व त्यानंतरचा कालावधी काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. मात्र हितशत्रूंकडे लक्ष ठेवा.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र नित्य म्हणा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी काम करणार्यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठी चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळा. काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. सप्ताह अखेर शेअर्स/ कमोडीटी अशा जोखीमीच्या व्यवहारापासून लांबच रहा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्रची मंगळाशी युती होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांशी संपर्क होईल. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचा उत्कर्ष होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)